विजेच्या धक्क्याने १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 17:07 IST2020-06-13T17:07:11+5:302020-06-13T17:07:18+5:30

१५ वर्षीय बालकाचा विजेचा जोरदार शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १३ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

15-year-old boy dies of electric shock | विजेच्या धक्क्याने १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

लोकमत न्युज नेटवर्क
उंबर्डा बाजार (वाशिम): कारंजा तालुक्यातील दुघोरा येथील भिंगी भागात राहणाऱ्या १५ वर्षीय बालकाचा विजेचा जोरदार शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १३ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
दुघोरा येथील मनभा मार्गावरील भिंगी भागात राहणारा प्रेम किशोर पंडीत १५ वर्षीय बालक घरातील टी. व्ही. सुरू करीत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने गंभीर जखमी झाला. काही सेवाभावी लोकांनी त्याला तातडीने उंबर्डाबाजार येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठीनेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला कारंजा हलविण्याचा सल्ला
दिला. उंबर्डाबाजार आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. नांदे यांनी तातडीने रूग्णवाहीका उपलब्ध करून देत त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले; परंतु तेथील डॉक्टरांनी प्रेमला मृत घोषित केले. प्रेम हा एकुलता मुलगा असल्याने परिसरात त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: 15-year-old boy dies of electric shock