जिल्ह्यात नव्याने आढळले १५ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:39+5:302021-02-05T09:24:39+5:30
गुरुवारी रात्री उशिरा व शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील लाखाळा येथील १, रमेश टॉकीजनजीक १, सिव्हील ...

जिल्ह्यात नव्याने आढळले १५ कोरोना बाधित
गुरुवारी रात्री उशिरा व शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील लाखाळा येथील १, रमेश टॉकीजनजीक १, सिव्हील लाईन येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, काटा येथील १, वाळकी येथील १, रिसोड शहरातील १, चिंचाबा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील दस्तापूर येथील १, शेलूबाजार येथील १, कारंजा शहरातील जे. डी. चवरे विद्यालयानजिक १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ७ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना बाधितांचा एकूण आकडा आता ७ हजार ११० वर पोहोचला असून ६ हजार ७९१ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे; तर १६५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १५३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.