शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

वाशिम कारागृहातील १४ कैद्यांची पॅरोलवर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:47 AM

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (कोवीड-१९) वाशिम जिल्हा कारागृहातील चौदा कैद्यांना २८ मार्चपासून ४५ दिवसासाठी मुक्त केले आहे.

- धनंजय कपाले लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात कोरोना व्हायरसचा वेगाने प्रादुर्भाव होत असल्याने राज्य सरकारने तुरूंगातील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील न्यायदंडाधिकारी यांनी वैयक्तीक जातमुचलक्यावर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (कोवीड-१९) वाशिम जिल्हा कारागृहातील चौदा कैद्यांना २८ मार्चपासून ४५ दिवसासाठी मुक्त केले आहे.कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर राज्यात कारागृहांतील गर्दी कमी करण्यासाठी राज्यभरात पॅरोल आणि जामिनावर तातडीने सुटका करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया शुक्रवारपासून वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एम. सय्यद, विधी व न्याय विभागाचे सचिव, राज्य विधी सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष व कारागृह महानिरीक्षक यांनी ७ वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेले आरोपी व कच्च्या कैद्यांना पॅरोल आणि जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.या अनुषंगाने वाशिम जिल्हा कारागृहातील १४ कैद्यांना मुक्त केले आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तुरूंग अधिकारी सोमनाथ पाडुळे यांनी व्यक्त केली.सोडलेल्या कैद्यांना काही अटी व शर्तीवर पॅरोल-जामीन मंजूर करण्यात आला. पॅरोल व जामीन देण्यात येणाऱ्यांमध्ये टाडा, पॉक्सो, आर्थिक गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगणारे, मोका तसेच देशविघातक कृत्य करणाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही असे तुरूंग अधिकाºयांनी स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस