वाशिम : १.७९ लाख शेतकऱ्यांना १३९.९९ कोटींची मदत वितरित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 13:50 IST2019-12-18T13:50:34+5:302019-12-18T13:50:39+5:30
२ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असून त्यांना मदतीसाठी शासनाकडून १७९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

वाशिम : १.७९ लाख शेतकऱ्यांना १३९.९९ कोटींची मदत वितरित!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असून त्यांना मदतीसाठी शासनाकडून १७९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. १७ डिसेंबरअखेर त्यातील १.७९ लाख शेतकºयांना १३९.९९ कोटींचे बँकांमार्फत वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख ८३ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिके, २९०५ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिके आणि ४३४ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात एकूण २ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असन मदतीकरिता १९७ कोटींचा निधी अपेक्षित असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार, राज्यशासनाने १९ नोव्हेंबरच्या शासन निर्णयान्वये ५६.५१ कोटी आणि १३ डिसेंबरच्या शासन निर्णयान्वये १२३.४८ कोटी असा एकूण १७९.९९ कोटींचा निधी मंजूर केला. १७ डिसेंबरअखेर या निधीपैकी १.७९ लाख शेतकºयांना १३९.९९ कोटींचा निधी वितरित करण्यात आला.
मदत वाटपात वाशिम जिल्हा क्रमांक एकवर
अवकाळी पावसाने पीक नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी मंजूर झालेला मदतनिधी वाटपाची प्रक्रिया सद्या सुरू असून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक गतीने मदतनिधी वाटपात वाशिम जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. १७ डिसेंबरअखेर प्राप्त निधीच्या ७७ टक्के निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.