अज्ञात तापेने ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 20:31 IST2017-08-20T20:30:48+5:302017-08-20T20:31:28+5:30
किन्हीराजा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे अज्ञात तापेची साथ असून, २० आॅगस्ट रोजी ११ वर्षीय बालिका प्रांजली घुगे हीचा उपचारादरम्यान अकोला येथील खासगी दवाखान्यात मृत्यू झाला.

अज्ञात तापेने ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हीराजा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे अज्ञात तापेची साथ असून, २० आॅगस्ट रोजी ११ वर्षीय बालिका प्रांजली घुगे हीचा उपचारादरम्यान अकोला येथील खासगी दवाखान्यात मृत्यू झाला.
गत १५ दिवसांपासून किन्हीराजा येथे अज्ञात तापेची साथ सुरू आहे. यामुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागातर्फे जनजागृती व औषधी पुरविणे अपेक्षीत असताना, केवळ पाण्यात टाकायचे द्रावण पुरविण्यात आल्याने रोष व्यक्त होत आहे. १६ आॅगस्ट रोजी अज्ञात तापेने ५५ वर्षीय ताईबाई घुगे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २० आॅगस्ट रोजी ११ वर्षीय बालिका प्रांजली घुगे हीचा मृत्यू झाला. गावातील वीजपुरवठा अनियमित असून, वारंवार खंडित होत आहे. अशातच गावात अनेक ठिकाणी घाण पाण्याचे डबके साचल्याने मच्छरांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते. आजाराला पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने आणि प्रशासनातर्फे उपाययोजनांची मोहिम शून्य असल्याने गावकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.