विशेष घटक योजनेचे १00 टक्के अनुदान वाटप

By Admin | Updated: May 14, 2014 00:47 IST2014-05-14T00:41:20+5:302014-05-14T00:47:31+5:30

विशेष घटक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या ४२१ लाभार्थीना अनुदान वाटपात मंगरूळपीर पंचायतसमितीने बाजी मारली असून १ कोटी २५ लाख रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

100% subsidy allocation for Special Component Plan | विशेष घटक योजनेचे १00 टक्के अनुदान वाटप

विशेष घटक योजनेचे १00 टक्के अनुदान वाटप

मंगरूळपीर : विशेष घटक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या ४२१ लाभार्थीना अनुदान वाटपात मंगरूळपीर पंचायत समिती ने बाजी मारली असून १ कोटी २५ लाख रूपयाचा प्राप्त अनुदान वितरण करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती भास्कर पाटील शेगीकर यांनी दिली. सन २0१३-१४ मध्ये विशेष घटक योजने अंर्तगत तालुक्यातील ४२१ लाभार्थींची निवड करण्यात आली होती. १९८२ पासुन सदर योजना राज्यात राबविण्यात येत आहे या काळात दरवेळी मंजुर लाभार्थीची आकडवारी १00 च्या आत असायची. मात्र २0१३ मध्ये प्रथमच हा आकडा तालुक्यातील मागासवर्गियांचे जिवनमान उंचविणारा ठरला. १ कोटी २५ लाखांपैकी पहिल्या टप्यात ६५ लाख रूपये प्राप्त झाले होते तर दुसर्‍या टप्याची अनुदानाची रक्कम जिल्हयाला प्राप्त झालेल्या ६५ लाखांपैकी ६0 लाख रूपये मंगरूळपीर पंचायत समितीने खेचुन आणले. त्यामुळे जवळपास सर्वच लाभार्थीना योजनेचा लाभ दिल्या माहीती प्राप्त झाली आहे ४२१ पैकी ३६0 लाभार्थीनी बैलजोडी, गाडीची तर ६१ लाभार्थीने सिंचन विहीरीची मागणी केली होती त्यानुसार सदर अनुदान वाटप करण्यात आले. बैलजोडी खरेदी करिता १ कोटी २ लाख ३0 हजार, लोखंडी गाडी करिता ८ लाख ८८ हजार,तर सिचन विहीरीच्या कामावर १३ लाख ८२ हजार खर्च करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विशेष घटक योजनेच्या लाभार्थींना अनुदान वाटप करण्यात मंगरूळपीर पंचायत समितीने जिल्हयात बाजी मारली आहे जि.प.उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या सहकार्यामुळे व पं.स.सभापती भास्कर पाटील यांच्या प्रयत्नामुळे १00 टक्के अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. पुर्वी लाभार्थींना धनादेशव्दारे अनुदान दिल्या जात होते मात्र सभापतीच्या सुचनेनुसार संबधीत रक्कम लाभार्थीच्या बॅक खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थींना होणारा त्रास कमी झाला आहे.

Web Title: 100% subsidy allocation for Special Component Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.