शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथील जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा १०० टक्के प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 16:02 IST

पहिल्याच दिवशी व्यापारी, नगर पंचायतसह नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून मालेगाव येथे १३ ते १५ जुलै या दरम्यान जनता कर्फ्यू पाळला जात असून, पहिल्याच दिवशी व्यापारी, नगर पंचायतसह नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.जिल्ह्यात मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात यामध्ये झपाट्याने वाढ होत असून, मालेगाव शहरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्य, परजिल्ह्यातून मालेगाव शहर व तालुक्यात परतलेल्या व परतत असलेल्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मालेगाव शहरात रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टिंग सुरू करण्यात आली. पॉझिटिव्ह रूग्णांच्या  संपर्कात आलेल्यांचे नमुने घेणे व त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे सुरू आहे. दुसरीकडे लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही, मालेगाव बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढला असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी, मोबाईल असोसिएशन, नगर पंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आदींनी पुढाकार घेतला असून, १३ जुलैपासून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूची हाक केली. त्यानुसार १३ जुलै रोजी शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. मेडीकल, दवाखाने व काही अत्यावश्यक सेवेचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही प्रकारची दुकाने उघडण्यात आली नाहीत. त्यामुळे पहिल्या दिवशी मालेगाव शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. किराणा असोसिएशन, मोबाईल असोसिएशन, सराफा असोसिएशन, कपडा असोसिएशन, कृषी व्यवसायिक संघटना, स्टेशनरी व्यवसायिक,  भाजीपाला यासह मालेगावकर, नगर पंचायतचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक यामध्ये सहभागी झाल्याने जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या