वाशिम जिल्ह्यात आणखी १० पॉझिटिव्ह; ८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 18:14 IST2021-07-15T18:14:24+5:302021-07-15T18:14:30+5:30
10 more positives in Washim district : १५ जुलै रोजी १० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ८ जणांनी कोरोनावर मात केली.

वाशिम जिल्ह्यात आणखी १० पॉझिटिव्ह; ८ कोरोनामुक्त
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून गुरूवार, १५ जुलै रोजी १० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ८ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,५९५ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. गुरूवारी नव्याने १० रुग्ण आढळून आले तर ८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव तालु्क्यात सलग दुसºया दिवशीही एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१५९५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०८८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.