शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

वसई गावातील सुरुची बाग समुद्रात एक तरुण बुडाला; अन्य 5 जण बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 3:05 PM

यातील अन्य 5 तरुणांना वाचवण्यात स्थनिक पोलीस व  पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

वसई - वसई गावातील पाचूबंदर स्थित सुरुची बाग समुद्रकिनारी मौजमजेसाठी गेलेल्या सहा तरुणांपैकी एक तरुण बुडाला असल्याची दुर्देवी घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. यातील अन्य 5 तरुणांना वाचवण्यात स्थनिक पोलीस व  पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

गणेश पांडुरंग खोत वय 19 रा.वसई पूर्व गोखीवरे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास म्हणजे 12 तासांनी हाती लागला असल्याचे वसई पोलिसांनी लोकमत ला सांगितले. वसई पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी दुपारी वसई पूर्वेतील सहा जणांचा एक ग्रुप वसईतील सुरुची बाग या समुद्रावर मौजमजेसाठी गेले असता तिथे हे सर्वजण पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले,परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने यातील गणेश नावाचा तरुण समुद्रात बुडाला व तो वाहून गेला.

त्याचवेळी लागलीच स्थानिकांनी वसई पोलीस व अग्निशमन दलाला बोलवून अन्य पाच जणांना वाचवण्यात यश आले परंतु गणेश चा शोध सुरूच होता अखेर सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास गणेश चा मृतदेह मिळून आला. दरम्यान सर्वत्र कोरोना चे संकट असताना व धोकादायक धबधबा,समुद्र किनारे याठिकाणी  प्रशासनाने बंदी घातली असताना देखिल तरुणाई ऐकत नाही त्यामुळे असे जीव गमवावे लागत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार