शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

उपचारांअभावी आईसमोर तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराच्या झटक्याने रस्त्यातच कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 2:26 AM

सफाळे येथे राहणाऱ्या रवी कसबे (३०) याच्या छातीत गुरुवारी पहाटे चार वाजता अचानक दुखू लागले. उपचारांसाठी त्याने अनेक डॉक्टरांचे दरवाजे ठोठावले; मात्र कोणीच दाद दिली नाही.

पालघर/सफाळे : सफाळे येथील ३० वर्षांच्या तरुणाला उपचार न मिळाल्याने त्याचा रस्त्यातच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आईसमोरच तडफडून मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. या तरुणाच्या मृत्यूने पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवेवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केले असून अद्ययावत जिल्हा रुग्णालयाची गरज अधोरेखित झाली आहे.सफाळे येथे राहणाऱ्या रवी कसबे (३०) याच्या छातीत गुरुवारी पहाटे चार वाजता अचानक दुखू लागले. उपचारांसाठी त्याने अनेक डॉक्टरांचे दरवाजे ठोठावले; मात्र कोणीच दाद दिली नाही. सकाळी छातीतील कळा वाढून अस्वस्थ वाटू लागल्याने तो पुन्हा आपली आई आणि अन्य नातेवाइकांसोबत डॉक्टरकडे जात होता. चालताना रवी कसबे सफाळे रेल्वे स्थानकाशेजारच्या वल्लभबाग गल्लीत खाली कोसळला. कोसळलेल्या मुलाचे डोके आपल्या मांडीवर घेऊ न त्याची छाती चोळत त्याला वाचवण्याचा प्रयत्न आई करत होती. मात्र, तिचे प्रयत्न अपुरे पडले. डोळ्यांदेखत मुलाला तडफडताना पाहून ती धाय मोकलून रडत होती. बाजूच्याच इमारतीत राहणाºया आसिफा शेख व त्यांच्या कुटुंबीयांची नजर तिच्याकडे गेली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर काही माणसे जमा झाली. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने मदतीचे हात पुढे येत नव्हते. शेवटी १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णवाहिका आल्यानंतर चालक सचिन भोईर व मिकेश शेट्टी यांनी त्याला उचलून गाडीत ठेवले. पालघर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.जिल्हा रुग्णालयाची गरजपालघर जिल्ह्यात तीन ग्रामीण रु ग्णालये, नऊ उपजिल्हा रुग्णालये, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३१२ आरोग्य उपकेंद्रे अशी आरोग्य यंत्रणा आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातून चांगल्या उपचारासाठी गुजरात, सिल्वासा येथे जाणारी हजारो पावले आजही थांबलेली नाहीत.जिल्हा मुख्यालयाच्या अंगणात जिल्हाधिकारी कार्यालयासह डझनभर अद्ययावत व प्रशस्त इमारती दिमाखदारपणे उभ्या राहत आहेत. मात्र, गरिबांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी जिल्हा रुग्णालये व प्रशिक्षण केंद्रे उभारणीसाठी आवश्यक जमीन मिळवण्यात येथील लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत.आता नव्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वाढीव जमिनीसाठी मागणी करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.वावर-वांगणीनंतरचे दुर्दैव : वावर-वांगणीत झालेल्या बालमृत्यूंनंतर आधी जव्हारला तेव्हाच्या ठाणे जिल्ह्याची विभागीय कार्यालये आली. पुढे जिल्हा विभाजन झाले. पालघर हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. तो करताना पुरेशा सोयी-सुविधांचे आश्वासन देण्यात आले. ते किती फोल ठरले ते या घटनेतून दिसून आले. आरोग्य यंत्रणा सलाइनवर असल्याचे स्पष्ट झाले. या जिल्ह्याकडे पाहण्याचा प्रशासकीय यंत्रणेचा दृष्टिकोन दिसून आला.

टॅग्स :palgharपालघर