बांधकामाच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:29 IST2019-07-31T00:28:55+5:302019-07-31T00:29:05+5:30
वसईतील घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बांधकामाच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू
वसई : रेल्वेच्या मल्टीफंक्शनल कॉम्प्लेक्सचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बांधकामाच्या बेसमेंटमध्ये जमलेल्या पावसाच्या पाण्यात पडून एका तरु णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वसई रोड पूर्वेस नुकतीच घडली आहे.
वसई रोड पूर्वेला रेल्वेस्टेशनलगत रेल्वेच्या मल्टीफंक्शनल कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. काही दिवसापासून हे काम तांत्रिक कारणामुळे बंद आहे. मात्र बांधकाम करणाºया विकासक आणि ठेकेदाराने येथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. तर पाण्याच्या पातळी संदर्भात धोक्याची सूचना असा सूचना फलकही येथे लावणे आवश्यक असतानाही तो लावण्यात आलेला नाही. बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी साचले असतानाही ठेकेदाराने येथे पक्की भिंत, कठडा अथवा सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. यामुळेच तरुणाचा खड्ड्यातील पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
निष्काळजीपणा अंगाशी
च्पावसाच्या पाण्यात पडून मृत्यू झालेल्या या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी येथील बांधकाम विकासक व त्यांच्या ठेका कंपनीचे संचालक आदींना जबाबदार धरून त्यांच्यावर माणिकपूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.