शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई जयंतीनिमित्ताने महिला मेळावा

By admin | Updated: January 11, 2016 01:44 IST

विधायक संसद व श्रमजीवी महिला ठिणगीच्या संयुक्त संयोजनातून विक्रमगड तालुक्यातील विठ्ठल मंदिर ज्ञानेश्वर माउली सभागृहामध्ये महिला मेळावा संपन्न झाला़

तलवाडा: विधायक संसद व श्रमजीवी महिला ठिणगीच्या संयुक्त संयोजनातून विक्रमगड तालुक्यातील विठ्ठल मंदिर ज्ञानेश्वर माउली सभागृहामध्ये महिला मेळावा संपन्न झाला़ या मेळाव्यात सावीत्रीबाईचे जीवनकार्य, महिलांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या अंधश्रध्दा व गैर प्रथा, कुपोषण निर्मूलन अभियानांर्तगत कुपोषणाची कारणे, उपाययोजना व कुपोषण निर्मूलन अभियानातील संघटनेचा विचार इ. विषयांबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यांत आले़ महिला मेळाव्यांच्या ठिकाणी विधायक संसद व वाचा संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार झालेल्या महिला ठिणगीच्या लर्निंग कम्युनिटी या युवती गटाकडून महिला मेळाव्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेविषयी जन जागृती करणारे अब नही तो कब ? हे पथनाटय सादर करण्यांत येते़ विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या इ़ ८ वीतील विद्यार्थीनी संचिता वरठा, वृषाली रेंजड, मनीषा जनाठे, योगीता खरपडे, या व बालसंघटनेच्या कार्यकर्त्या असलेल्या सोनाली लोखंडे, गीता खिराडे, नीलम बीज, दिपाली भोईर या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवती या पथनाट्यात भूमिका साकार करीत आहेत. एकलव्य परिवर्तन विद्यालयात शिक्षण घेतलेली व सध्या कायद्याचा अभ्यास करीत असलेली पूजा सुरुम ही त्याचे संयोजन करीत आहे़ कुपोषण निर्मूलन अभियाना अंतर्गत जनजागृतीपर असलेले पथनाटय एकलव्य परिवर्तन षाळेच्या पूजा वांगड, निशा गोवारी, जुई गावित, प्राजक्ता नानकर, ज्योती वड, हर्षला थोरात,बेबी चौधरी, मनिषा वाघ, प्रियंका नानकर, सपना जाधव या मुली मेळाव्यांतून सादर करतात़ श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युल्लताताई पंडित यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनातून तयार झालेल्या महिला ठिणगी कार्यकर्त्या पालघरच्या महिला ठिणगी प्रमुख अनिता धांगडा, सचिव सरिता जाधव, संघटक दामिनी भोईर, रेखा धांगडे, नंदा विघ्ने, प्रमिला महाले यांच्या संयोजनातून पालघर जिल्हयांतील वसई, वाडा,व पालघर तालुक्यांत मेळावे सपंन्न झाले़ तर ठाणे जिल्हयांत जिल्हा महिला ठिणगी प्रमुख जया पारधी, उपप्रमुख नंदा वाघे, सचिव संगीता भोमटे, संघटक आशा भोईर, यांच्या टिमने भिवंडी व ठाणे तालुक्यांतील मेळाव्यांचे संयोजन केले़ विधायक संसदेच्या सचिव स्रेहा दुबे यांचे मार्गदर्शन व नियोजनातून या मेळाव्यांची आखणी झाली़ कुपोषण निर्मुलन विषयक जनजागृती, महिलांविषयक, कायदे, अंधश्रध्दा व स्त्रीयांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या गैर सामाजिक प्रथा-परंपरा महिलांच्या ग्रामसभा, पेसा कायद्यातील तरतुदी इ़ विषयांवर ठिणगीच्या कार्यकर्त्यां महिला मेळाव्यांमधून मांडणी करीत आहेत़ विक्रमगडच्या महिला मेळाव्याप्रसंगी संघटनेचे सहसरचिटणीस विजय जाधव, युवा बालसंघटक प्रमुख अनिल जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, जिल्हा उपध्यक्ष लक्ष्मण फडवले, जिल्हा ठिकणी प्रमुख अनिता धांगडा, उपप्रमुख सविता कासट, सचिव सरिता जाधव, प्रभारी ता़ अध्यक्ष तथा उपाध्यक्ष गंगाराम वरठा, तालुका सचिव कैलास तुंबडा, महिला ठिणगी संघटक दामिनी भोईर, रेखा धांगडे, राज्य व्यवस्थापन समिती सदस्य कमलावती जाधव, झोनप्रमुख हिराबाई जाधव उपस्थित होते़(वार्ताहर)