सोन्याच्या बाळींसाठी दाबला पत्नीचा गळा, नालासोपारा येथे घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 10:03 IST2022-11-21T10:02:54+5:302022-11-21T10:03:15+5:30

संतोष भवनच्या चौधरी कंपाउंड येथील समीरा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या संजू सरोज (वय ३५) या महिलेची हत्या शनिवारी झाली.

wife strangled for gold earrings, Nalasopara incident | सोन्याच्या बाळींसाठी दाबला पत्नीचा गळा, नालासोपारा येथे घडली घटना

सोन्याच्या बाळींसाठी दाबला पत्नीचा गळा, नालासोपारा येथे घडली घटना

नालासोपारा : आईच्या तेराव्याच्या कार्यासाठी लागणारे पैसे उपलब्ध व्हावे म्हणून पत्नीकडे पतीने कानातील सोन्याच्या बाळी मागितल्या. तिने देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पेल्हार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. फरार आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पेल्हार पोलिस पुढील तपास करत आहेत.

संतोष भवनच्या चौधरी कंपाउंड येथील समीरा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या संजू सरोज (वय ३५) या महिलेची हत्या शनिवारी झाली. पती राजेश विश्वकर्मा याच्या आईचे निधन झाले होते. तिच्या तेराव्याच्या कार्यासाठी लागणारे पैसे त्याच्याजवळ नव्हते. म्हणून त्याने पत्नीकडे तिच्या कानातील सोन्याच्या बाळी मागितल्या; पण तिने देण्यास नकार दिला. हाच राग मनात धरून आरोपीने त्यांना मारहाण करून गळा आवळून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह घरातच ठेवून दरवाजाला कुलूप लावून आरोपी फरार झाला आहे. शेजारच्यांना रूममधून वास येत असल्याने आयुक्तालयाच्या ११२ हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून ही माहिती दिली.

सोन्याच्या बाळीवरून तीन दिवसांपूर्वी या दोघांमध्ये भांडण झाले होते. यापूर्वी त्यांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यात आले होते. हे इतकेच दागिने असल्याने ते देण्यास पतीला पत्नीने नकार दिला होता. हत्येचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली आहे. 
- महेंद्र शेलार, पोलिस निरीक्षक (गुन्हे), पेल्हार पोलिस ठाणे
 

Web Title: wife strangled for gold earrings, Nalasopara incident