नायब तहसीलदार यांच्या सेवा पुस्तिकेत वारस म्हणून नाव लावण्याची पत्नीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:57 IST2026-02-15T15:57:22+5:302026-02-15T15:57:47+5:30

लातूरच्या अंबाजोगाई मार्गावर बनसोडे रुग्णालय परिसरात राहणाऱ्या प्राची भुर्के यांनी ठाणे जिल्हाधिकारी सह शासनास लेखी निवेदन दिले आहे.

Wife demands to include name as heir in Naib Tehsildar Prathamesh Bhurke's service book | नायब तहसीलदार यांच्या सेवा पुस्तिकेत वारस म्हणून नाव लावण्याची पत्नीची मागणी 

नायब तहसीलदार यांच्या सेवा पुस्तिकेत वारस म्हणून नाव लावण्याची पत्नीची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड- सध्या मीरा भाईंदर अपर तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार असलेल्या प्रथमेश भुर्के यांच्या पत्नीने थेट जिल्हाधिकारी यांना अर्ज देऊन पतीच्या सेवा पुस्तकात वारस म्हणून नाव दाखल करण्यासह अर्धा पगार देण्याची मागणी केली आहे.

लातूरच्या अंबाजोगाई मार्गावर बनसोडे रुग्णालय परिसरात राहणाऱ्या प्राची भुर्के यांनी ठाणे जिल्हाधिकारी सह शासनास लेखी निवेदन दिले आहे. त्यासोबत प्रथमेश बबन भुर्के यांच्यावर दाखल गुन्हे व दोषारोपपत्र जोडलेले आहे. त्यात प्रथमेश यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार बद्दल गुन्हा दाखल आहेच शिवाय पत्नी प्राची यांचे समाज माध्यमावर बनावट आयडी तयार करून त्याद्वारे बदनामी आणि त्रास दिल्याच्या गुन्ह्यात तर प्रथमेश यांच्यावर लातूर पोलिसांनी दोषारोपपत्र देखील न्यायालयात सादर केलेले आहे. 

पती ने माझे चारित्र्य हनन करून मला अतोनात मानसिक, शारिरीक व भावनिक त्रास दिला असून गेले २ वर्षपासून मला त्यांनी घरातून हाकलून दिले आहे. तेव्हा पासून कसल्याही प्रकारची मदत दिलेली नाही. माझे वडील मयत आसून आई थकलेली आहे व भाऊ लहान शिक्षण घेत आहे. त्यामुळे मला जिवन जगणे असहय झाले आहे. माझ्या पतीने त्यांच्या सेवा पुस्तीकेत वारस म्हणून माझे नाव लावलेले नाही. तरी त्यांनी त्यांच्या सेवा पुस्तीकेत वारस म्हणून पत्नी या नात्याने माझे नाव लावण्याचेव त्यांच्या पगाराच्या उत्पन्नातून अर्धी रक्कम मला दरमहा देण्याचे आदेश दयावेत. त्यांच्या वर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी प्राची यांनी केली आहे. 

लग्ना नंतर तिने आपल्या आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. त्यातून कौटुंबिक वाद करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. घटस्फोट साठी दावा दाखल केलेला आहे असे नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के यांनी म्हटले आहे.  

Web Title : पत्नी ने तहसीलदार पति से वारिस का दर्जा, आधी सैलरी माँगी

Web Summary : तहसीलदार की पत्नी ने घरेलू हिंसा और उत्पीड़न का हवाला देते हुए वारिस का दर्जा और आधी सैलरी की याचिका दायर की। उसने परित्याग और समर्थन की कमी का आरोप लगाते हुए कानूनी कार्रवाई की मांग की। तहसीलदार ने झूठे आरोप और लंबित तलाक का दावा किया।

Web Title : Wife Demands Name as Heir, Half Salary from Tehsildar Husband

Web Summary : Tehsildar's wife petitions for heir status and half his salary, citing domestic abuse and harassment. She alleges abandonment and lack of support, seeking legal action. The Tehsildar claims false charges and a pending divorce.