शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:25 IST

जिल्ह्यात वाढवण, जिंदाल बंदर, बुलेट ट्रेन आदी विनाशकारी प्रकल्पाचे बरोबरच, सूर्याचे पाणी, कुपोषण, रोजगार आदी महत्वपूर्ण प्रश्नांच्या आगीत इथला स्थानिक नागरिक होरपळत आहे

हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात वाढवण, जिंदाल बंदर, बुलेट ट्रेन आदी विनाशकारी प्रकल्पाचे बरोबरच, सूर्याचे पाणी, कुपोषण, रोजगार आदी महत्वपूर्ण प्रश्नांच्या आगीत इथला स्थानिक नागरिक होरपळत आहे. या वर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष १ मेची वसईची सभा आटपून २ मे रोजी पालघर मधील आदिवासी, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यास विकासाची अनेक दालने उघडली जातील या सर्वसामान्यांच्या अपेक्षा फोल ठरत असून जिल्हानिर्मितीनानंतर ४ वर्षाचा कालावधी उलटूनही स्थानिकांचे प्रश्न सुटण्याऐवजी त्यांच्यापुढे अनेक जीवघेण्या प्रश्नांचा डोंगर उभा करून ठेवला आहे. सुर्या सारख्या आदिवासी आणि शेतकºयांना समृद्ध करणाºया प्रकल्पाचे पाणी जिल्ह्याबाहेर वळवून इथले सिंचन क्षेत्र ओसाड पडण्याचे काम युतीच्या सरकारने केले आहे तर दुसरीकडे विक्र मगड, वाडा, पालघर, डहाणू या भागातील नागरिकाना आपल्या हक्काचे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्याचे घसे कोरडे पडत आहेत.कुपोषण निर्मूलनासाठी कोट्यवधी रु पयाचा खर्च केंद्र व राज्य शासनाकडून केला जात असताना कुपोषणाची दाहकता कमी करण्यास सत्ताधाºयांना अपयश आले आहे. त्याचबरोबरीने जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्यसेवेची व्यवस्था पाहता त्याअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर दुसरीकडे रु ग्णांवरील उपचारासाठी गुजरात व सेलवास येथील रु ग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.पालघर जवळील नांदगाव किनाºयावर होऊ घातलेली जिंदाल जेट्टीमुळे परिसरातील मुरबे, नवापूर, उच्छेळी-दांडी, सातपाटी, वडराई सारख्या मासेमारी बंदराना धोका पोचून त्या बंदरासमोरील माश्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला गोल्डन बेल्ट संपुष्ठात येणार होता. तसेच, जवळ असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पास निर्माण होणारा धोका पर्यावरणाबरोबरीने समुद्राचे होणारे प्रदूषण आदी कारणांमुळे स्थानिकांचा या जेट्टीला मोठा विरोध असताना भाजप सरकारने वाढवण बंदराची घोषणा करून इथल्या स्थानिकांच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम केले आहे. पालघर-ठाण्यातून धडधडत जाणाºया अहमदाबाद बुलेट ट्रेनने १४८.७२ किमीच्या मार्गावरील हजारो शेतकºयांच्या जमिनी आणि स्थानिकांची घरे उध्वस्त होणार आहेत. त्यापाठोपाठ डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉर व मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे अशा प्रकल्पामध्येही इथला शेतकºयांच्या जमिनीवर वरवंटा फिरणार आहे.या आदिवासीबहुल जिल्ह्यात तरु णांच्या नोकरीचा प्रश्न आ वासून उभा असून जिल्हा कौशल्य रोजगार विभागांतर्गत या तरु णांना नोकºयांची आश्वासने देणाºया सरकारने त्यांची पार फसवणूक केली असून जिल्ह्यात निर्माण होणाºया नोकºया स्थानिक तरु णांच्या डोळ्यासमोर बाहेरील उमेदवाराना बहाल केले जात आहेत. नोकरभरतीच्या परीक्षांचे पेपर फुटण्याच्या घटना नेहमीची बाब झाली असून त्याचा फायदा जिल्ह्या बाहेरील उमेदवारांना मिळत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. जिल्ह्यातील डहाणू ते वैतरणा स्थानकांंदरम्यान उपनगरीय रेल्वेचा दर्जा मिळाला असला तरी येथील रेल्वे प्रवाश्यांचा समस्या सुटण्याचे नाव घेत नसून लोकल सेवेत वाढ होत नसून लांब पल्ल्याच्या गाड्याना थांबा दिला जात नसल्याने प्रवाश्यात मोठी नाराजी आहे.शासनाच्या महत्वाकांक्षी अशा मनरेगा योजनेतून देण्यात येणारा रोजगार व त्याचे पैसे वेळीच दिले जात नसल्याने स्थलांतराचा मोठा प्रश्न उभा आहे. परिणामी रोजगाराच्या शोधार्थ हजारो कुटुंबाना जिल्ह्याबाहेरील इतर जिल्ह्यात जावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य, शिक्षण आदींसह कुटुंबातील त्यांच्या महिलांना शोषणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वसई सह अन्य काही तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून आठवड्यात तीन ते चार मुलींच्या अपहरणाच्या घटना, खून, लैंगिक शोषण, चेन स्नॅचिंग, शासकीय जागेवरील अतिक्र मण, खंडणी आदी विषयांना ते स्पर्श करतील अशी अपेक्षा आहे.किनारपट्टीला भेट देऊन स्थानिकांशी साधणार संवादमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे २ मे रोजी ते वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी आदी भागांना भेटी देऊन स्थानिकांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या धडाक्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काही प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी माहिती मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी दिली. सभेचा आराखडा पूर्ण झाला असून बैठक व्यवस्था, वाहने उभी करण्यासाठी पार्कींग झोन तयार करण्यात आले आहे. या सभेचे निवेदन पालघर पोलीसांना दिल्याची माहिती महाराष्टÑ नवनिर्माण शारीरीक सेनेचे राज्य उपाध्यक्ष अजय दाभोळकर यांनी लोकमतला दिली आहे.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे