शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाण्याचे स्रोत, शेतकरी-ग्रामस्थांची मात्र वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:37 IST

राहुल वाडेकर  विक्रमगड : पूर्वीचा ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने सहा वर्षांपूर्वी नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्यात ...

राहुल वाडेकर विक्रमगड : पूर्वीचा ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने सहा वर्षांपूर्वी नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उद्धार व्हावा व नागरिकांना पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाने आदिवासी उपयोजनेतून येथील पाणी स्रोतांच्या आधारावर मोठी धरणे प्रस्तावित केली व ती धरणे सिंचनासाठी अस्तित्वात आणली असली तरी आजही जिल्ह्यात धरणे असूनही जिल्हावासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, ही शोकांतिकाच आहे.

जिल्ह्यातील धरणांचे पाणी इतरत्र वळवून धरणांशेजारील गावे आजही पाण्यापासून उपेक्षितच आहेत. साधे पिण्याचे पाणीही या धरणांलगतच्या गावांना मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. डहाणू तालुक्यातील चंद्रनगर व हनुमाननगर ही पुनर्वसित गावे, पोफरण अक्करपटी याचे जिवंत उदाहरण म्हणता येईल.

याच बरोबरीने कवडास व धामणी धरण अंतर्गत असलेल्या सूर्या प्रकल्पातून जिल्ह्याच्या डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यात कृषी सिंचनाचे मूळ उद्दिष्ट समोर ठेवून शासनाने सूर्या प्रकल्प अस्तित्वात आणला असला तरी या प्रकल्पातील पाणी इतरत्र वळवून येथील शेतकऱ्यांची घोर निराशा सरकारने चालवली आहे. हजारो दशलक्ष घनलीटर पाणी दररोज वसई-विरार, मीरा-भाईंदर व मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाला देऊन येथील शेती सिंचनातून बाद केली असल्याचा आरोप केला जात आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार