शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्ती हवीय? लग्नात ‘तिसरा मंडप’ नको!

By admin | Updated: January 9, 2016 01:53 IST

लग्नाआधी तिसरा मंडप म्हणजे हळदीच्या कार्यक्रमातून दारू पिण्याची प्रथा बंद करण्यासाठी सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाने तिसरा मंडप नको म्हणून

वसई : लग्नाआधी तिसरा मंडप म्हणजे हळदीच्या कार्यक्रमातून दारू पिण्याची प्रथा बंद करण्यासाठी सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाने तिसरा मंडप नको म्हणून विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला साथ देणाऱ्या समाजबांधवांचा जाहीर सत्कारही करण्यात येणार आहे.वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यांत सोमवंशी क्षत्रिय समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. समाजात लग्नाआधी हळदीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर दारू पिण्याची प्रथा आहे. त्यामुळे व्यसनाला प्रोत्साहन मिळते. तर, अशा प्रथेमुळे ज्यांची ऐपत नाही, अशा कुटुंबाला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. म्हणून ही प्रथा मोडीत काढण्यासाठी संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांनी मोहीम हाती घेतली आहे. एकजुटीने ही प्रथा मोडीत काढू, असे आवाहन चोरघे यांनी केले होते. त्याला अनेकांनी साथ दिली. अशा कुटुंबांचा जाहीर सत्कार केळवे येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सवात करण्यात येणार आहे. ९ व १० जानेवारीला क्रीडा महोत्सवसंघाचा ३८ वा क्रीडा महोत्सव ९ व १० जानेवारी २०१६ रोजी केळवे येथील कै. बी.के. राऊत (अण्णा) क्रीडानगरी, आदर्श विद्यामंदिर पटांगण येथे संपन्न होत आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन टेक्सस अमेरिका हाफ-आयर्न मॅन ट्रायथलॉनपटू हार्दिक पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असून या वेळी प्रमुख अतिथी जागतिक व आशियाई पदक विजेत्या, अ‍ॅथलिट स्रेहल रजपूत-राऊत उपस्थित राहणार असून स्वागताध्यक्ष केळवे गावचे सरपंच अरविंंद वर्तक हे भूषवणार आहेत.१० जानेवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एअर कंट्रोल इंडिया प्रा.लि.चे चेअरमन व मॅनेजिंंग डायरेक्टर अशोक पाटील उपस्थित राहणार आहेत. या वेळी विशेष अतिथी म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कारप्राप्त पल्लवी वर्तक तसेच आॅस्ट्रेलिया येथे झालेल्या जागतिक मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकविजेते विजय चौधरी व अमन चौधरी हजर राहणार आहेत. (वार्ताहर)