शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Virar Hospital Fire : मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून चौकशीअंती माहितीचे प्रसिद्धीपत्रक जारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 1:50 PM

Virar Hospital Fire: रुग्णालयातील आयसीयू  युनिटमध्ये एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते, यापैकी 13 रुग्णांना व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन इ. उपचार यंत्रणा जोडली असल्याने ते हालचाल करू शकले नाही आणि त्यामुळे या सर्वांचा दुर्दैवाने  मृत्यू झाला.

- आशिष राणे 

वसई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास मध्यरात्री ३ च्या सुमारास आग लागून १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीच्या घटनेबाबत वसई-विरार मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून शुक्रवारी दुपारी 12 वाजता संपूर्ण घटना, रुग्णालयातील उपचार घेत असलेले रुग्ण तसेच मयत झालेले रुग्ण यांच्याबाबतच्या प्रत्यक्ष चौकशीनंतर आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक वजा स्पष्टीकरण जारी केले आहे.

या संदर्भात माहिती स्पष्ट करताना स्पष्ट केलं की, विजयवल्लभ हॉस्पिटल, तिरुपती फेज 1 बोळींज, विरार (प.) या तळ + 4 मजली रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर या रुग्णालयात सुमारे 85 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. या रुग्णालयामध्ये पहिला मजला जनरल वॉर्ड, दुसरा मजला आयसीयू वॉर्ड, आणि तिसरा व चौथा मजला म्हणून  स्पेशल वॉर्डचे नियोजन केलेले आहे. 

(Virar Hospital Fire Live Updates : विरारमधील कोविड सेंटरला आग, 13 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा)

दरम्यान, शुक्रवार दि.23 एप्रिल, 2021 रोजी पहाटे 03.13 वाजता रूग्णालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या (अतिदक्षता विभाग ) आयसीयू युनिटमध्ये एसी स्पार्क होऊन ब्लास्ट झाल्यामुळे सदर आयसीयू  युनिटमधील यंत्रणा ठप्प होऊन तेथे आग लागल्याची व सर्वत्र धूर व अंधार पसरला असल्याची माहिती महानगरपालिका अग्निशमन विभागाला 3 वाजून 18 मिनिटांनी मिळताच पहाटे 03 .18 वाजता महानगरपालिका अग्निशमन विभाग यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी जाऊन पहाटे 03.45  वाजेपर्यंत तेथील आगीवर नियंत्रण मिळवले.

(Virar Hospital Fire : 'सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण...' - राज ठाकरे)

विशेष म्हणजे, या रुग्णालयातील आयसीयू  युनिटमध्ये एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते, यापैकी 13 रुग्णांना व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन इ. उपचार यंत्रणा जोडली असल्याने ते हालचाल करू शकले नाही आणि त्यामुळे या सर्वांचा दुर्दैवाने  मृत्यू झाला. तर प्रामुख्याने इतर 04 रुग्णांना महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेमार्फत तात्काळ दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. 

(Virar Hospital Fire : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर)

या संपूर्ण घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णांमध्ये 5 महिला व 8 पुरुष यांचा समावेश असून त्यांची नावे खालीलप्रमाणे -१)    उमा सुरेश कनगुटकर  (63 वर्षे – महिला)२)    निलेश भोईर (35 वर्षे – पुरुष)३)    पुखराज वल्लभदास वैष्णव (68 वर्षे- पुरुष)४)    रजनी आर. कुडू (60 वर्षे –महिला)५)    नरेंद्र शंकर शिंदे (58 वर्षे – पुरुष)६)    जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (63 वर्षे पुरुष)७)    कुमार किशोर दोशी ( 45 वर्षे – पुरुष)८)    रमेश टी. उपायान (55 वर्षे – पुरुष)९)    प्रवीण शिवलाल गौडा (65 वर्षे – पुरुष)१०)     अमेय राजेश राऊत (23 वर्षे – पुरुष)११)     शमा अरुण म्हात्रे (48 वर्षे – महिला)१२)     सुवर्णा एस.पितळे (64 वर्षे – महिला)१३)     सुप्रिया देशमुख (43 वर्षे – महिला)

टॅग्स :Vasai Virarवसई विरारhospitalहॉस्पिटल