शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

विक्रमगडमध्ये एक गाव एक होळी; आज होणार चोरटी होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 4:05 AM

विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात आजही ‘एक गाव एक होळी’ची परंपरा कायम ठेवली आहे. ग्रामीण खेडया-पाडयात, शिळ, आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, ओंदे, दादडे या भागात आजही पारंपारिक पध्दतीनेच सण साजरे करण्याची पंरपरा आहे.

- राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यातील अनेक गावात आजही ‘एक गाव एक होळी’ची परंपरा कायम ठेवली आहे. ग्रामीण खेडया-पाडयात, शिळ, आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, ओंदे, दादडे या भागात आजही पारंपारिक पध्दतीनेच सण साजरे करण्याची पंरपरा आहे. याउलट शहरी भागात गल्ली-गल्लीत प्रत्येक सोसायटी, नगरात छोटया मोठया होळया पेटवुन नंतर धुळवडीचे रंग उधळले जातात. मात्र ग्रामीण भागात आधुनिक युगाामध्येही एक गाव एक होळी अशी परंपरा आजही सुरु आहे़पहिले तिन दिवस छोटया होळया व मंगळवारी मुख्य होळी पेटण्याच्या आदल्या दिवशीम्हणजेच चौथा दिवशी चोरटी होळी आणि शेवटच्या म्हणजेच २० मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस होळीचा सण साजरा केला जातो़या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफऱ्यांचा (डफली) आवाज आजही शिमगा आल्याची ग्वाही देत आहे़चोरटी होळीसाठी तरुण गावातुनच लाकडे चोरुन आणतात़ पाचव्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने मोठी होळी रचली जाते. या होळीची पारंपारिक पध्दतीने पुजा केली जाते़ गावातील नवविवाहीत जोडपी या होळीभोवती पाच फेऱ्या मारण्याची पध्दत आहे. त्यानंतर होळी पेटविली जाते़होळीत भाजलेल्या नारळांचा प्रसाद घेण्यासाठी सर्वाचिच झुंबड उडत असते़ साखरेच्या पाकापासुन तयार केलेले गाठीहार लहान मुले होळीच्या दिवशी गळयात घालून मिरवतात. दरवर्शी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या जागेला होळीची माळ असे म्हणतात़ याच माळावर पाच दिवस विविधखेळ, गरबानृत्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम, तर ग्रामीण खेडया पाडयावर तारपा नृत्य, ढोलनाच, लेझीम ंव सामुहिक गरबानृत्य असे विविध कार्यक्रम रात्रभर खेळले जातात़होळीच्या दुसºया दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी घरोघरी पुरणपोळया केल्या जातात़ धुलीवंदनाला मनसोक्त धुळवड खेळली जाते तर, रंगपंचमीला गावाकडे झाडा-फुलांपासुन तयार केलेले नैसर्गीक रंगाचा आवर्जुन वापर केला जातो़ सध्या बाजार पेठेमध्ये अनेक रंग मिळत असले तरी ग्राहक नैसर्गिक रंगाची मागणी करीन आहेत.पूजेची आगळी परंपरा अन् कोंबडीचे पिलूहोळीच्या दिवशी भेंडीचे झाड (फांदी) अगर बांबुच्या फांदया होळीमाता म्हणुन आणुन त्याची पुजा केली जाते. पुजेला तांदळाच्या नागलीच्या व कुरडई पापडया, पुरणपोळी घरी बनवलेल्या वस्तुंचा नैवैद्य दाखविला जातो़बांबु किंवा भेंडींच्या फांदीला टोकाला खेड्यावर अगर रितीप्रमाणे जिवंत कोंबडीचे पिल्लु बांधले जाते ही प्रथा आजही आबाधीत आहे. त्याचप्रमाणे नवीन लग्न झालेले आपल्या पत्नीला खांदयावर उचलून होळी मातेला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा असून त्याची आजही अंमलबजावणी होत आहे़

टॅग्स :HoliहोळीVasai Virarवसई विरार