शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहने चोरणारी सराईत टोळी गजाआड

By admin | Updated: May 3, 2015 05:41 IST

राज्यातील विविध शहरांमधून वाहने चोरणाऱ्या एका सराईत टोळीला नुकताच गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली

मुंबई : राज्यातील विविध शहरांमधून वाहने चोरणाऱ्या एका सराईत टोळीला नुकताच गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल १ कोटी ६५ लाख किमतीची २१ चोरलेली वाहने हस्तगत केली आहेत.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहारांमधून कार आणि ट्रक चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याबाबत मुंबईसह राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र ही टोळी पोलिसांच्या हाती लागत नव्हती. या टोळीला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकानेदेखील तपास सुरू केला होता. वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांना या टोळीबाबत काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली. त्यानुसार एपीआय जयद्रथ तांबे, आनंद मुदलीयार आणि पोलीस शिपाई माईनकट्टे, सोनकांबळे या पथकाने औरंगाबाद, कोल्हापूर आणि बेळगाव या ठिकाणी छापे घालत सलीम सय्यद (२५), अजहर शेख (२६), मैनुद्दीन पठाण (४०), इरफान खान (३०) आणि गुलफाम खान (२२) या पाच जणाना अटक केली. चौकशीत या आरोपींनी मुंबईसह कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि गुजरात येथून १७ कार आणि २ ट्रक चोरल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ही सर्व वाहने हस्तगत केली आहेत. यामध्ये आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून त्यानुसार पोलीस याची अधिक चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)