शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

वसईकर हर्षाली वर्तकने लीलया केले किलिमांजारो सर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 10:53 PM

१९,३४१ फूट सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई; १६ देशी-विदेशी गिर्यारोहकांच्या चमूचे केले नेतृत्व, आता पुढील लक्ष्य काचंनजंगा!

वसई : देशात व आंतरराष्ट्रीयस्तरावर आपल्या अनेक खडतर व साहसी मोहिमा यशस्वी करणाऱ्या वसईच्या ३५ वर्षीय हर्षाली वर्तक हिने पुन्हा एकदा जगप्रसिद्ध असे आफ्रिका खंडातील सर्वात उंच माउंट किलिमांजारो हे शिखर २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सर केले. ती सोमवारी मायदेशी परतली आहे.हर्षालीने आपल्या देश- विदेशातील एकूण १६ जण सहभागी असलेल्या गिर्यारोहकांचे नेतृत्व केले. त्यापैकी केवळ ९ जणांच्याच चमूने हे सर्वोच्च शिखर सर केले असल्याची माहिती हर्षालीने लोकमतला दिली. मुळातच खराब हवामान, शून्य तापमान, हिमवर्षाव, सोसाट्याचा वारा त्यात काहींची तब्येत खालावली, प्राणवायूची कमतरता आदी गंभीर बाबीमुळे १६ गिर्यारोहकापैकी ७ जणांना अर्ध्यावरूनच बेस कॅम्पला परतावे लागले, त्यामुळे केवळ ९ जणांनाच या सर्वोच्च अशा किलिमांजारो या शिखरावर यशस्वी चढाई करता आली.१८ जानेवारी रोजी वसईतून थेट टांझानिया-केनियाला ती रवाना झाली.तिचा चमू १९ तारखेला पोहोचला मारुंगा गेट येथून गिर्यारोहण सुरु झाले. प्रत्यक्षात २४ जानेवारीला सकाळी शिखर सर करून पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला, मारुंगा गेट पासून सुरु झालेला हा खडतर प्रवास मंदार हट, होरम्बो, किनो, गिलमन, स्टेला, उहूरू आणि किबो मार्गे हे सर्वोच्च शिखर गाठण्यात आले. दरम्यान ‘माउंट किलिमांजारो’ हे आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. टांझानियाच्या ईशान्य भागात व केनियाच्या सीमेजवळ असलेल्या या शिखराची उंची (५८९५ मी ) म्हणजेच १९,३४१ फूट इतकी असून हे आव्हानात्मक शिखर हर्षाली आणि तिच्या ९ सहकाऱ्यांनी सर केल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.१६ पैकी ९ जणांनी केले शिखर सरविशेष म्हणजे यावेळी स्वत: हर्षाली या मोहिमेचे नेतृत्व केले असून तिच्या जोडीला कॅप्टन बिजॉय यांनी तिला सहाय्यक म्हणून सहकार्य केले आहे. तर यामध्ये तिच्या समवेत देशातील हैद्राबाद, बंगळुरू, दिल्ली आणि खास करून साऊथ आफ्रिका, रशिया , आॅस्ट्रेलियातील नावाजलेल्या अशा १९ गिर्यारोहकांचा या मोहिमेत सहभाग होता.महाराष्ट्रासहित देश-विदेशात अनेक शिखरे पादाक्रांत!सह्याद्री पर्वत रांगेतील गडामध्ये कळसुबाई, नाणेघाट, लोहगड, हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा, कलावंतीण असे अनेक ट्रॅक तिने पूर्ण केले आहेत.हर्षालीने हिमालयातील अनेक शिखरे पादाक्रांत केली असून यामध्ये प्रामुख्याने माउंट फ्रेंडशिप पीक ( ५२८९ मिटर ), माउंट हनुमान तीब्बा ( ५९९० मिटर ), माउंट युनाम (६११८ मिटर ), माउंट मेन्थोसा (६४४३ मिटर ), माउंट फुजी ( ३७७६ मिटर ) (जपान मधील सर्वाधिक उंचीचे शिखर) यांचा समावेश आहे.यावेळी मी पहिल्यादांच एक आंतरराष्ट्रीय आणि खडतर अशा मोहीमेचे नेतृत्व करीत होती, त्यामुळे माझ्यावर स्वत:ची व इतर १५ सहकाऱ्यांची अधिक जबाबदारी होती, मोठा अनुभव पाठीशी असल्यानेच मी यशस्वी झाले, आता कांचनजंगा सर करण्याचा मानस आहे, - हर्षाली वर्तक,गिर्यारोहक,वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरार