तलासरीत आदिवासींचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:31 IST2017-08-10T05:31:06+5:302017-08-10T05:31:10+5:30

अच्छे दिनाचे गाजर दाखवीत सरकार अनेक प्रकल्प आणून या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत आहे, आदिवासी शेतकरी तसेच भूमिपुत्रांना उध्वस्त करून सरकार कोणाचा विकास करू पाहत आहे.

Tribal Elgar | तलासरीत आदिवासींचा एल्गार

तलासरीत आदिवासींचा एल्गार

सुरेश काटे 
तलासरी : अच्छे दिनाचे गाजर दाखवीत सरकार अनेक प्रकल्प आणून या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत आहे, आदिवासी शेतकरी तसेच भूमिपुत्रांना उध्वस्त करून सरकार कोणाचा विकास करू पाहत आहे, विकासाच्या नावाखाली बड्या शेठ सावकाराच्या , भांडवलदारांच्या फायद्या साठी पर्यावरणाला उध्वस्त करणाºया प्रकल्पा विरोधात महाराष्ट्र गुजरात मधील जवळ पास २५ संघटनानी येथे विराट मेळावा घेऊन सरकारला इशारा दिला.
९ आॅगस्ट या आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन तसेच आॅगस्ट क्र ांती दिनाच्या निमित्ताने तलासरीत हजारोच्या संख्येने आदिवासी विविध संघटनेच्या माध्यमातून एकत्र जमून भांडवलदारांच्या फायद्यासाठी पर्यावरण उध्वस्त करणाºया प्रकल्पांविरोधात एल्गार पुकारला.
तलासरी जवळील वडवली निलिगरी हॉटेल जवळून महामार्गा वरून हजारोच्या संख्येने भूमिपुत्र मोर्चाने तलासरी बस डेपो येथे जमले नंतर सभा झाली, या वेळी विविध संघटनेच्या नेते व पदाधिकार्यांनी बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे, वाढवण बंदर , सागरी महामार्ग, समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग, विकास आराखडा, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, या सरकारच्या प्रकल्पाला कडाडून विरोध करण्यात आला,
या जमलेल्या हजारो समुदायाला माकपा चे लहानु कोम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, माकप भूमीपुत्राच्या बाजूने असून अन्यायकारक प्रकल्पाला तो विरोध करेल, तसेच वाढवण बंदराचे नारायण पाटील यांनी वाढवण बंदरामुळे मच्छीमार व डायमेकिंगचा व्यवसाय धोक्यात येणार आहे, या बंदराला प्राधिकरणाने स्थगिती दिली असताना सरकार जबरदस्तीने प्रकल्प लादत असल्याचे सांगितले.
तसेच एकता परिषदेचे विनोद दुमाडा, संतोष पावडे, डॉ सुनील पºहाड, गुजरात खेडूत समाजाचे सागर रबारी, अशोक चौधरी, रमाकांत पाटील, काळूराम धोदडे, ब्रायन लोबो, चंद्रशेखर प्रभू इत्यादीं सह अनेकांनी मार्गदर्शन केले मोठया संख्येने आदिवासी मोर्चेकरी महामार्गावरून चालू लागल्याने गुजरात बाजू कडील वाहतूक जवळपास तीन तास ठप्प झाल्याने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या अन्यायकारक प्रकल्प रद्द न केल्यास दिल्ली गाठून संसदेवर धडकण्याचा इशारा दिला. गरज भासल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णयही यावेळी घोषित करण्यात आला.
 अनेक संघटना सहभागी
प्रकृती व समाज संवर्धन परिषद मध्ये चले जावं चा इशारा देण्यासाठी भूमिपुत्र बचाव आंदोलनाच्या झेंड्याखाली भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, खेडूत समाज, शेतकरी संघर्ष, वाढवण बंदर विरोधी कृती समतिी, मच्छीमार कृती समिती, कष्टकरी संघटना, सूर्या पाणी बचाव समिती, पर्यावरण संवर्धन समिती , पर्यावरण सुरक्षा समिती, आदिवासी किसन संघर्ष मोर्चा, युवा कोळी परिवर्तन ट्रस्ट, खेडूत हितरक्षक दल, श्रमीक संघटना, सगुना संघटना, युवा भारत तसेच अशा जवळ पास २५ संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Tribal Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.