शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

फळ वाइन व्यवसायाला पर्यटनाची जोड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:09 AM

२०० प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग : बागायती क्षेत्राचा तोटा नफ्यात परावर्तित होणार?

पालघर : कोकणासह जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू, जांभूळ, केळी, फणस यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या फळांचा स्वाद, चव यांचा उपयोग फळ वाईन व्यवसायात केल्यास याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. पर्यटन व्यवसायाला याची जोड दिल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल. फळ प्रक्रि या उद्योग आणि फळ वाईन निर्मितीद्वारे तोट्यात जाणारे बागायती क्षेत्र नफ्यात रूपांतरित करण्यासंदर्भात आयोजित प्रशिक्षण शिबिराला तरुण वर्गातून चांगला प्रतिसाद लाभला.दरम्यान, शेतकºयांकडे उत्पादित होणाºया या नाशवंत शेतीमालापैकी बरेच उत्पादन वेळेत विकले न गेल्याने तसेच योग्य प्रकारे प्रक्रिया करून साठवणूक न केल्याने वाया जाते. कोकणातील ५ टक्के इतके क्षेत्रफळ हे फळ लागवडीखाली येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, चिकू, जांभूळ, केळी, फणस यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोकणात फळ वाईन व्यवसाय हा पर्यटन व्यवसायासोबत जोडल्यास कोकणातील प्रमुख व्यवसाय असलेले शेती, मत्स्य, पर्यटन यांना त्याचा जास्त फायदा होईल. मलबेरी, ब्लूबेरी, पीच या फळांचा तुलनेने कोकणातील फळांना नैसर्गिक स्वाद, चव, मधूर वास असल्याने यातून तयार होणारी वाईन, सरबते जास्त स्वादीष्ट असतील आणि हे अनुभवण्यासाठी मुंबई, देशाअंतर्गत पर्यटक इतकेच मर्यादित न राहता परदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने कोकणात येऊ शकतील. यातून कोकणातील शेती, मत्स्य व पर्यटन पूरक सर्वच व्यवसायांना रोजगार वाढीसाठी फायदा होईल, असे मत समृद्ध कोकण संस्था पालघरचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी व्यक्त केले. यामुळे तोट्यात जाऊ शकणारी शेती - वाडी या प्रक्रिया उद्योग आणि फळ वाईन निर्मितीमुळे नफ्यात रूपांतरित होऊ शकेल. ‘कोकणातील फळ व्यावसायिकांना हमी भाव मिळावा म्हणून वाईन क्लबची निर्मिती केली आहे. या वाईन क्लबच्या माध्यमातून पुढील काही वर्षांत शंभराहून अधिक वायनरी प्रकल्प आपण उभे करणार आहोत. यामुळे कोकणातील काजूची बोंडे, आंबा, जांभूळ, चिकू बागायतदारांना याचा फायदा होऊ शकेल’, असे मत समृद्ध कोकण संघटने संस्थापक संजय यादवराव यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य शासनाने १६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात महाराष्ट्रात उत्पादित होणाºया द्राक्ष वगळून इतर फळांना उत्पादन शुल्कातून प्रती बल्क लीटरला एक रुपया इतकी सूट देण्यात आली आहे. या कार्यक्र माला प्रमुख मार्गदर्शक म्हणून निलेश लेले, अध्यक्ष, असोसिएशन आॅफ फूड सायंटिस्ट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, मुंबई विभाग आणि प्रियंका सावे, फ्रिजांतो वाईनच्या सर्वेसर्वा उपस्थित होत्या. निलेश लेले यांनी फळांवरील प्रक्रिया आणि पॅकेजिंगची माहिती दिली तर प्रियंका सावे यांनी या व्यवसायातील अनुभव व शासकीय परवानगीविषयी माहिती दिली.या प्रशिक्षण शिबिरात फळ प्रक्रिया आणि या उद्योगातील संधी, फळ वाईन निर्मिती व्यवसाय, या विषयातीस विविध शासकीय योजनांची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली. सोबत प्रमाणपत्रही देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात पालघर-ठाणे सोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई या भागातून २०० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.