वसईजवळ स्पोर्ट्स बाइक अपघातात तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 06:42 IST2026-03-01T06:42:41+5:302026-03-01T06:42:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा/पारोळ : भरधाव वेगाने जाणाऱ्या महागड्या स्पोर्ट्स बाइकचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात ...

वसईजवळ स्पोर्ट्स बाइक अपघातात तिघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा/पारोळ : भरधाव वेगाने जाणाऱ्या महागड्या स्पोर्ट्स बाइकचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात एका पादचाऱ्यासह दुचाकीवरील दोघा तरुणांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी येथे हा अपघात घडला.
विरार येथे राहणाऱ्या शाहरूख खान हा तरुण सुझुकी हायाबुसा या महागड्या स्पोर्ट्स बाइकने मित्र अर्जुन शेट्टी (२५) याच्यासोबत गेला होता. विरारला घरी परतताना रात्री १० च्या सुमारास साधना हॉटेलजळ ईश्वर साव (१९) हा तरुण रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी शाहरूखचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची ईश्वरला जोरदार धडक बसली. या अपघातात पादचारी ईश्वर साव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याला धडक दिल्यानंतर दुचाकी शंभर मीटरपर्यंत दूरवर फेकली गेली. गंभीर जखमी असलेल्या शाहरूख आणि अर्जुन यांचाही काही वेळात घटनास्थळी मृत्यू झाला.