शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना २०१७ साला प्रमाणेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 22:36 IST

शहराची सध्याची लोकसांख्या हि अंदाजे ११ लाख ८२ हजारांच्या घरात असल्याचे मानले जाते. २०२१ ची जनगणनाच नसल्याने प्रभाग रचना हि जुन्या २०११ सालच्या ८ लाख ९ हजार ३७८ इतक्या जनगणनाचा आधार घेऊन केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धीरज परब/मीरारोड- मीरा भाईंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २४ प्रभागांची प्रभाग रचना गुरुवारी जाहीर निर्णयात आली आहे. २०११ सालच्या जनगणने नुसार प्रभाग रचना असून पूर्वी प्रमाणेच ९५ नगरसेवक संख्या कायम आहे. प्रभागांची रचना देखील २०१७ च्या पालिका निवडणुकी नुसार तशीच आहे. हरकती सूचना साठी नागरिकांना १५ सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. 

मीरा भाईंदर महापालिका नगरसेवकांची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपल्या नंतर प्रशासकीय राजवट सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारी काळात तीन सदस्य प्रभाग रचना तयार केली होती. मात्र महायुती सरकार नंतर ती रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर जून २०२५ मध्ये राज्य शासनाने महापालिका निवडणूक घेण्याची कार्यवाही सुरु केली. मीरा भाईंदर महापालिकेत आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षते खालील समितीने प्रारूप प्रभाग रचना बनवून ती शासनास व शासनाने राज्य निवडणूक आयोगास सादर केली होती. 

शहराची सध्याची लोकसांख्या हि अंदाजे ११ लाख ८२ हजारांच्या घरात असल्याचे मानले जाते. २०२१ ची जनगणनाच नसल्याने प्रभाग रचना हि जुन्या २०११ सालच्या ८ लाख ९ हजार ३७८ इतक्या जनगणनाचा आधार घेऊन केली आहे. नगरसेवकांची संख्या ९५ इतकी कायम आहे. एकूण २४ प्रभाग असून २३ प्रभागां मधून ४ नगरसेवक निवडून जाणार आहेत. तर गेल्यावर्षी प्रमाणेच उत्तन - पाली परिसराचा प्रभाग २४ हा ३ नगरसेवकांचा असणार आहे. 

प्रारूप प्रभाग रचनेचा गुगल अर्थ नकाशा, प्रभाग निहाय चतुःसीमा, हद्दीतील परिसर आदींची माहिती महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. पालिकेच्या मुख्य कार्यालय व ६ प्रभाग समिती कार्यालयात देखील हे प्रारूप प्रभाग रचना नकाशे, हद्दी व माहिती ठेवण्यात आली आहे. 

हरकती सूचना ऑनलाईन नाही जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या भौगोलिक सीमा, परिसर बाबत  हरकती व सूचना द्यायच्या असल्यास त्या कार्यालयीन वेळेत १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजे पर्यंतच्या मुदतीत द्याव्या लागतील. आयुक्तांच्या नावे मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयातील ३ ऱ्या मजल्या वरच्या निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष लेखी स्वरूपात द्यायच्या आहेत. ऑनलाईन, ईमेल वर केलेल्या हरकती व सूचना ह्या स्वीकारल्या जाणार नाहीत असे आयुक्तांनी जाहीर केले आहे. 

आरक्षण सोडत नंतर महापालिका निवडणुकीत ९५ पैकी ५० टक्के जागा ह्या महिलांसाठी राखीव असल्याने ४८ जागा महिलांसाठी असतील. या शिवाय ओबीसीची जनसंख्या मोजणी नसली तरी २७ टक्के प्रमाणे २६  जागा ह्या इत्तर मागास प्रवर्ग त्स्थत ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. तर अनुसूचित जाती साठी ४ व अनुसूचित जमातीसाठी  १ जागा राखीव राहणार आहे. मात्र सदर आरक्षण प्रभागांची सोडत नंतर जाहीर होणार आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक