‘त्या’ महिलेचे धड अखेर सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:10 IST2025-03-19T14:10:00+5:302025-03-19T14:10:19+5:30
८ जानेवारी रोजी या महिलेच्या पतीने तिची हत्या करून धड आणि शिर वेगळे केले होते. १४ मार्चला हा प्रकार समोर आला होता...

‘त्या’ महिलेचे धड अखेर सापडले
नालासोपारा : विरार येथे एका सुटकेसमध्ये महिलेचे शिर आढळले होते. यानंतर या घटनेतील मृत महिलेचे धड मांडवी पोलिसांना मंगळवारी आढळून आले. ते त्यांनी ताब्यात घेतले. चार तास नाल्यात घेतलेल्या शोधमोहिमेनंतर हे महिलेचे धड मिळाले. ८ जानेवारी रोजी या महिलेच्या पतीने तिची हत्या करून धड आणि शिर वेगळे केले होते. १४ मार्चला हा प्रकार समोर आला होता.
नालासोपारा येथील रेहमतनगरमधील उत्पला हिप्परगी या महिलेची कवटी पिरकुंडा दर्ग्याजवळील झुडपात आढळली होती. घटनास्थळी आढळलेल्या पाकिटावरून महिलेची ओळख पटवली होती. त्यानंतर तपासाअंती महिलेचा पती हरीश हिप्परगी (४९) याला अटक केली होती. मंगळवारी मांडवी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शोधमोहीम राबवली असता पोलिसांनी हरीशला घटनास्थळी आणले होते. त्याने नाल्यातील जागा दाखवली. अखेर तेथे महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील धड आढळले.