दुहेरी हत्यांकाडातील मुख्य आरोपीला १६ वर्षानंतर अटक, नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 00:00 IST2025-12-24T00:00:23+5:302025-12-24T00:00:48+5:30
Nalasopara Crime News: नालासोपारा शहरातील दुहेरी हत्यांकाडातील मुख्य आरोपीला १६ वर्षानंतर अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे.

दुहेरी हत्यांकाडातील मुख्य आरोपीला १६ वर्षानंतर अटक, नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश
- मंगेश कराळे
नालासोपारा - शहरातील दुहेरी हत्यांकाडातील मुख्य आरोपीला १६ वर्षानंतर अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. २९ एप्रिल ते २ मे २००९ साली बिलालपाडा येथील खंडोबा मंदीरा जवळ विनोद शंकरलाल जयस्वाल (३८) हे आरोपी कैलास ललन यादव, विनय उर्फ अजय, धर्मेद्र सोनी आणि किरण सोनी या चौघांनी मिळुन दलालीचे पैसे घेण्याकरीता आला होता. आरोपींनी आपसात संगनमत करुन त्याचे हातपाय नायलॉनचे दोरीने व साडीने बांधुन गमचाने (टॉवेलने) गळा आवळुन तोंडा भोवती कपडा गुंडाळून जिवे ठार मारले होते. नालासोपारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीचा शोथ घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपास सुरू केला.
आरोपी हा अपराध केल्यापासुन आपली ओळख लपवुन तो इटारसी, भोपाळ मध्यप्रदेश येथे राहत होता. तांत्रिक विश्थेलण व बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नायगाव पूर्वेकडील परीसरात सापळा रचून मुख्य आरोपी अविनाश लालताप्रसाद सोनी (४२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात नमूद गुन्ह्याची कबूली दिल्याने त्याला सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास अटक केली. आरोपीने चौकशीदरम्यान आझमगड उत्तरप्रदेश येथे सन १९९८ मध्ये खुन केल्याची कबुली दिलेली आहे. त्या गुन्ह्याची पोलीस माहिती घेत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव थादवड, सपोनि राजेंद्र चंदनकर, पोउपनि रंगनाथ गिते, पोहवा प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नादुलकर, प्रेम घोडेराव, प्रताप शिंदे आणि बाबासाहेब बनसोडे यांनी केलेली आहे.