जव्हारमध्ये नवऱ्याने धारधार हत्याराने केला पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 16:11 IST2023-11-14T16:11:30+5:302023-11-14T16:11:54+5:30

हेदीचापाडा येथील आरोपी नरेश जिव्या गवळी वय 40 याने तिची पत्नी सरिता वय 35 हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

The husband killed his wife with a sharp weapon | जव्हारमध्ये नवऱ्याने धारधार हत्याराने केला पत्नीचा खून

जव्हारमध्ये नवऱ्याने धारधार हत्याराने केला पत्नीचा खून

(हुसेन मेमन)

जव्हार -  जव्हार तालुक्यातील पिंपळशेत- खरोंडा पैकी हेदीचापाडा येथील नवऱ्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तीक्ष्ण धारधार हत्याराने गळ्यावर वार करत जीव ठार मारण्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली. 

हेदीचापाडा येथील आरोपी नरेश जिव्या गवळी वय 40 याने तिची पत्नी सरिता वय 35 हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, दोघांमध्ये नेहमीच यावरून वाद होत होते सोमवारी रात्री त्याने पत्नी सरिताच्या कानाच्या खाली गळ्यावर कोयत्याने वार करीत खून केला असून, जव्हार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपी नरेश याला अटक करण्यात आली असून, त्याला 19 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 

Web Title: The husband killed his wife with a sharp weapon