शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

तहसीलदार कार्यालयात घुसखोरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 04:56 IST

प्रशासकीय कागदपत्रांशी छेडछाड : वसईच्या नायब तहसिलदारांचा लॅपटॉपही केला आॅपरेट

नालासोपारा : तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या वसई तहसीलदार कार्यालयामध्ये हल्ली खाजगी दलालांचा हस्तक्षेप थेट शासकीय कारभारात सुरु असल्याचा आरोप व तशी व्हिडिओ क्लिप शहर कॉँग्रेसकडून तहसीलदार किरण सुरवसे यांना देण्यात आली आहे. अशी तक्रार प्रांताधिकारी, जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.

या कार्यालयामध्ये विविध दाखल्यांसाठी शेकडो नागरिक दररोज येत असतात. या लोकाभिमूख कार्यासाठी एक खिडकी योजन सुद्धा आहेत. मात्र, असे असतांनाही अशी कामे तात्काळ करुन देण्याच्या हमी पोटी अनेक नागरिक अशा दलालांच्या नादाला लागतात. याच संदर्भात वसई कॉँग्रसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी एक व्हिडिओ क्लिप सोशल मिडियाद्वारे सर्वां समोर आणली असून त्यात नायब तहसीलदार स्मिता गुरव यांच्या डेस्कवरील लॅपटॉप उघडून त्यातील माहिती एक अनोळकी इसम पाहत असून तेथील कागदपत्रांशी छेडछाड करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या द्वारे त्यांनी दिलेल्या पत्रात वसई तहसील कार्यालयातील नायब तहसिलदारांच्या कार्यालयातील लॅपटॉप, महत्वाची शासकीय कागदपत्रे, दस्तावेज, विविध प्रकारचे दाखले राजरोसपणे कार्यालयाबाहेरील व्यक्ती हाताळत असल्याचे रोज पहायला मिळत असते.

क्लिपमध्ये दिसणारी व्यक्ती कार्यालयात रोज येत असून नायब तहसीलदारांच्या अनुपिस्थतीत त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रे हाताळत असते. या व्यक्तीची व्हिजिटींग बुकात नोंद केलेली आहे का?, ते जर शासकीय कर्मचारी असतील तर त्यांची सेवा पुस्तके वर संकलित केलेली माहिती उपलब्ध आहे का? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. वर्तक यांनी सदर व्यक्ती शासकीय कागदपत्रे अनधिकृत पणे हाताळत असल्याचे व्हििडओ चित्रण व व फोटो उपविभागीय अधिकारी वसई यांच्याकडे पाठविले असल्याचे सांगण्यात आले. वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी या इसमांना नायब तहसीलदार यांच्या कार्यालयाचा वापर करण्याची परवानगी दिली नसेल तर शासकीय कामात हस्तक्षेप करणाºया या गंभीर प्रकाराची दखल घेऊन त्यांना योग्य ते शासन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले होते आदेशच्वसईचे तत्कालीन तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांच्या विरोधात दोन वर्षापूर्वी वकीलांनी राज्यपालांकडे तक्र ार केली होती. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, अशी मागणी होती. त्याचवेळी त्यांनी कार्यालयातील अनागोंदीला चाप लावण्यासाठी कार्यालयातील कर्मचाºयांना ओळखपत्र अनिवार्य करावे अशी मागणी केली होती. अ‍ॅड. किशोर म्हात्रे यांनी याबाबत तत्कालिन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे तशी मागणी केली असता, त्यांनी १२ फेब्रुवारी २०१६ रोजी तहसिलदारांना तसा आदेश दिला होता. मात्र, वर्षभरात या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले.मे २०१७ मध्ये झाल्या होत्या तडकाफडकी बदल्याच्वसई तहसिलदार पदाला अभिश्राप असल्याचे अलिकडच्या एकंदरित घडामोडीत दिसून येते. शासकीय अधिकारºयांची एका जिल्ह्यात तीन वर्षाकरीता नियुक्ती केली जाते. मात्र, वसई तहसीलदार पदी मागील अनेक वर्षापासून तो कार्यकाळ पूर्ण होताना दिसला नाही. गजेंद्र पाटोळे यांना देखील जेमतेम वर्ष ते दिड वर्ष झाले होते. मात्र, त्यांची कल्याणला तडका फडकी बदली केल्याने परिसरात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होती. त्यानंतर वसई तहसिलदारपदी कल्याणला आपला ३ वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केलेले किरण मदन सुखवसे यांची नियुक्ती करण्यात आली होती.नायब तहसीलदारांनी केला इन्कारच्नायब तहसीलदार स्मिता गुरव यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. तो लॅपटॉप माझा खाजगी असून दुरूस्तीसाठी आलेल्या व्यक्तीचे छायाचित्र असल्याचा खुलासा त्यांनी केला. शासकीय कामकाजासाठी जर मी माझा लॅपटॉप वापरत असेन आणि बिघडल्यावर कुणाला दुरूस्तीला बोलावले तर काय चुकले असा सवाल त्यांनी केला. उलट शासकीय जागेत प्रवेश करून अशाप्रकारे चोरून छायाचित्र काढणे गुन्हा असून याविरोधात तक्र ार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार कार्यालयात कुठल्याही खाजगी व्यक्तीने ढवळाढवळ करुन नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.या प्रकरणाची शहानिशा करून तहसीलदार किरण सुरवसे यांनी वसई काँग्रेस कडे लेखी खुलासा करावा. तसेच या इसमाच्या कार्यालयीन कामाच्या हस्तक्षेपाबाबत सविस्तर माहिती द्यावी. यासंदर्भात विभागिय अधिकाºयांना तक्रार करण्यात आली आहे. - कुलदीप वर्तक, युवक कॉँग्रेस अध्यक्ष, वसई विधानसभा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcongressकाँग्रेस