शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे तंत्रज्ञान; डहाणूच्या कोसबाड येथील कृषि विज्ञान केंद्रात यशस्वी प्रात्यक्षिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 7:32 PM

पालघर जिल्ह्यातील चिकू, आंबा आणि नारळ बागांसाठी वरदान ठरणार असल्याचा व्यक्त केला जातोय विश्वास

ठळक मुद्देपालघर जिल्ह्यातील चिकू, आंबा आणि नारळ बागांसाठी वरदान ठरणार असल्याचा व्यक्त केला जातोय विश्वास

अनिरुद्ध पाटीलडहाणूतील कृषि विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथे चेन्नईतील गरुडा एरोस्पेस प्रा. लि. कंपनी यांच्या सहाय्याने ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले. हे तंत्रज्ञान पालघर जिल्ह्यातील चिकू, आंबा आणि नारळ बागांसाठी वरदान ठरणार आहे. या यशस्वी ड्रोन उड्डाणामुळे फळबागायतींवर कमी वेळ व खर्चात फवारणी शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.

कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्र आणि चेन्नईतील गरुडा एरोस्पेस प्रा. लि. कंपनी यांच्या सहाय्याने या विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी तंत्रज्ञानाचे  प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले. एका वेळी 10 लिटर एवढ्या क्षमतेने 500 मीटरपर्यंत ड्रोनची फवारणीची क्षमता आहे. या प्रत्यक्षिकात नारळाच्या उंच झाडावरून मानवरहीत फवारणी तंत्रज्ञान पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी या कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी शेती क्षेत्रात ड्रोन वापराचे महत्त्व पटवून दिले. मनुष्यबळाची कमतरता, वेळ आणि श्रम वाचविणे, फळ झाडांची अती उंची, यावर उपाय म्हणून ड्रोनद्वारे फवारणी उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाच्या वापराने एकरी औषध कमी लागणार असून केवळ 15 मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी करता येते. या कार्यक्रमास गरूडा एरोस्पेस कंपनीचे पायलट विजय नारायणन, सह पायलट अँटोनी जेगस्टीन तसेच कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे, रूपाली देशमुख, अनुजा दिवटे, रिझवान सय्यद, अनिलकुमार सिंग, प्रशांत वराठा, प्रसाद कासले, दामिनी, लीनिता तांडेल आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रdahanu-acडहाणू