स्वत:चे चित्र रेखाटून शिक्षकाची आत्महत्या, डहाणूमधील हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 04:06 IST2020-07-18T04:06:01+5:302020-07-18T04:06:42+5:30
गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत चित्रकला शिक्षक होते. ते वारली चित्रकलेचे जाणकार होते. २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.

स्वत:चे चित्र रेखाटून शिक्षकाची आत्महत्या, डहाणूमधील हृदयद्रावक घटना
कासा : डहाणू तालुक्यातील निंबापूर (महालपाडा) येथील ३१ वर्षीय कलाशिक्षकाने स्वत:चे चित्र रेखाटत त्याखाली मृत्यू दिनांक लिहून गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी घडली आहे. याबाबत गुरुवारी संध्याकाळी कासा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गंगाराम चौधरी असे मृताचे नाव असून त्याने मृत्यू दिनांक लिहिलेला आणि हार घातलेल्या चित्राचे फोटो काही नातेवाइकांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले होते.
गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत चित्रकला शिक्षक होते. ते वारली चित्रकलेचे जाणकार होते. २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. बुधवारी दुपारी घरातील सर्व जण शेतावर गेले होेते. त्यामुळे गंगाराम हे घरात एकटेच होते. ही वेळ साधून त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.