शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नक्वींंपुढे मांडल्या तारापूरच्या उद्योजकांनी समस्या

By admin | Updated: January 8, 2016 01:55 IST

आगामी केंद्रीय बजेट कसे असावे तसेच बजेट बाबतच्या अपेक्षा काय आहेत याची चाचपणी करण्याकरीता तसेच उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या

बोईसर : आगामी केंद्रीय बजेट कसे असावे तसेच बजेट बाबतच्या अपेक्षा काय आहेत याची चाचपणी करण्याकरीता तसेच उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्याकरीता केंद्रीय संसदीय व अल्पसंख्यांक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज तारापुर एमआयडीसी मध्ये येऊन उद्योजकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.तारापूर एमआयडीसी मधील टीमा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस पालघर लोकसभेचे खा. अ‍ॅड. चिंतामण वनगा, आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, डहाणूचे आ. पास्कल धनारे, भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव अर्चना वाणी, तारापूर इंडस्ट्रीज, मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टिमा) चे अध्यक्ष डी. के. राउत इ. मान्यवरांसह तारापूरचे उद्योजक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अर्चना वाणी यांनी कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सांगितल्यानंतर टीमाचे अध्यक्ष डी. के. राऊत यांनी जीएसटी लागू केल्यास औद्योगिक उत्पादनाची किंमत कमी होईल म्हणून जीएसटीची अंमलबजावणी करण्याची मागणी करून महाराष्ट्रात वीज इतर राज्याच्या तुलनेत सर्वात महाग असून वीज दर कमी करण्याची मागणी केली तसेच जास्तीत जास्त वीना खंडीत वीजपुरवठा व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली. वीज पुरवठ्यातील बिघाड दुरूस्त करण्यास लागणाऱ्या विलंबाचा मुद्दा उपस्थित करून वीजपुरवठा कंपनीचे इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत निकृष्ट असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. सेल टॅक्स रिफंड करीता सध्या दोन ते तीन वर्ष लागतात त्याऐवजी आर्थिक वर्षातून प्रत्येक तीन महिन्यांनी रिफंड द्यावा तसेच एक्सपोर्टचा एक्साईज रीफंड डायरेक्ट बँकेत जमा करावा प्रदूषण नियंत्रण प्रोजेक्टला ८० टक्के मदत केंद्र व राज्य सरकारने करावी, इ. मागण्या उद्योजकातर्फे करण्यात आल्या. तर तारापुर इंडस्ट्रीज मधून सरकारला प्रतिवर्षी सुमारे तीन हजार करोड रू. टॅक्सच्या रूपात महसूल मिळूनही तारापुर येथे इन्फ्रास्ट्रक्चर काहीही नसल्याबाबतही रात्त यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले.(वार्ताहर)