शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरचे १२ प्रस्ताव मंजूर, १७ धूळखात

By admin | Updated: March 10, 2017 03:35 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

- रविंद्र साळवे,  मोखाडादरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे मार्च एप्रिलमध्ये उधभवणाऱ्या भीषण पाणी टंचाईला कसे सामोरे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, त्या संदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टॅँकरच्या १२ प्रस्तावांना मंजूरी मिळाली असून १७ प्रस्ताव अजुनही धुळखात पडून आहेत.मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून तालुक्यातील धामणी कुंडाचापाडा तुंगारवाडी स्वामीनगर दापटी ब्राम्हणगाव हटीपाडा घोसाळी गोळीचा पाडा धामोडी पेंडक्याची ठवळ पाडा टेलीउंबरपाडा असे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे २९ प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने सादर केलेले मोखाडा तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांना २४ तासात मंजुरी देणे असा शासन नियम असताना एक महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर गोळीचापाडा, धामोडी, दापटी , धामणी, स्वामीनगर, कुंडाचापाडा, ब्राम्हणगाव, तेलीउबरपाडा, ठवळपाडा, चास, हटितीपाडा असे ३ गावे ९ पाड्यांचे प्रस्ताव व यांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८ टॅकर मंजूर करण्यात आले आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला धामोडी गोळीचा पाडा ठवळपाडा अशा तीन गावपाड्यांना २ टँकरने पाणी पुरवठा सुरु असून १ टँकर उभे करून ठेवले आहेत. उर्वरित १७ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर धूळखात पडले आहेत. यामुळे येथील गावपाड्यांना अद्याप तरी त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. दरवर्षीच येथील भूमीपुत्रान वर पाणी टंचाईचे संकट येत असल्याने घोटभर पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते. टँकरच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्च करणारे प्रशासन या ठिकाणी मुबलक पाणीसाठा असूनही निजोजन करण्याचा प्रयत्न करत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांचे सदोष धोरण अन् टंचाईचा कळस- झोपी गेलेले प्रशासन अजूनही पाणी टंचाई कडे गांभीर्य ने बघत नाही येथील रोजगाराचा प्रश्न किंवा कुपोषण पाणीटंचाई समस्या असो माध्यमांची भूमिका निर्णायक राहिली आहे. गेल्या काही महिन्यापासून मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधव पाणी टंचाईच्या समस्येने बेजार झाला आहे.याबाबत लोकमतने सडेतोड लिखाण करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. त्याच बरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा टँकरच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिल्याने तात्काळ ९ प्रस्ताव व ६ टँकर मंजूर केल्या आहेत परंतु असे असले तरी घोटभर पाण्यासाठी कोसोमैल भटकंती करावी लागत आहे.२४ तासात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे धोरण असताना जिल्हाधिकारी या धोरणाची अम्मल बजावणी करीत नाहीत. त्यामुळे एक महिन्याचा कालावधी नंतरही १७ प्रस्ताव पडून आहेत. १२ प्रस्तावना मंजुरी दिली असली तरी ३ गावानाच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.