विरार रेल्वेस्टेशनवर हायटेन्शन वायरींमध्ये स्पार्क, सर्व काही सुस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 11:31 AM2021-06-02T11:31:52+5:302021-06-02T11:32:33+5:30

Virar News: पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रं.2 वर आज दि 2 जून रोजी सकाळी ठिक 8 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास हायटेन्शन वायरिंग मध्ये स्पार्क झाल्याची घटना घडली आहे. 

Spark in high tension wires at Virar railway station | विरार रेल्वेस्टेशनवर हायटेन्शन वायरींमध्ये स्पार्क, सर्व काही सुस्थितीत

विरार रेल्वेस्टेशनवर हायटेन्शन वायरींमध्ये स्पार्क, सर्व काही सुस्थितीत

googlenewsNext

वसई -  पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रं.2 वर आज दि 2 जून रोजी सकाळी ठिक 8 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास हायटेन्शन वायरिंग मध्ये स्पार्क झाल्याची घटना घडली आहे.  मात्र हे स्पार्क केवळ एक मिनिटच होते तर या स्पार्क मुळे घडलेल्या घटनेत प्लॅटफॉर्मवर कुठलीही जीवीत अथवा कोणी यात प्रवाशी जखमी झालेलं नाही असे प्रवाशांनी सांगितले. 

दरम्यान मंगळवारी रात्री वसई विरार मध्ये पाऊस ,वारा व वीजा ही चमकत होत्या. त्यामुळे जोरदार वारा व पावसामुळे येथील रेल्वेच्या हायटेन्शन वायर एकमेकांना लागून त्यातून एकच मिनिटांसाठी हा स्पार्क झाला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोन्ही वायर मध्ये स्पार्क होण्याची ही तिसरी घटना आहे मात्र तरीही याठिकाणी सर्व काही सुस्थितीत जरी असले तरी खबरदारी म्हणून रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता म्हणून वायरिंग बाबतीत उपाययोजना करावी असे प्रवाशी वर्ग सांगत आहेत

Web Title: Spark in high tension wires at Virar railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.