सोळा वर्षीय आदिवासी मुलाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 10:50 IST2020-08-22T10:49:56+5:302020-08-22T10:50:08+5:30

पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ शोध मोहीम हाती घेतली. मात्र अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले

Sixteen-year-old tribal boy drowns in floodwaters in bordi | सोळा वर्षीय आदिवासी मुलाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

सोळा वर्षीय आदिवासी मुलाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

पालघर/बोर्डी - डहाणू तालुक्यातील बोर्डीनजीकच्या अस्वाली गावातील तेरा वर्षीय आदिवासी मुलगा सतीश लाडक्या बुजड याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी घरानजीकच्या ओढ्याच्या प्रवाहात सतीश पाय घसरून पडला. या परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. 

पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ शोध मोहीम हाती घेतली. मात्र अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले. दरम्यान शनिवारी सकाळी 9 वाजून 47 मिनिटांच्या सुमारास अस्वाली जुनी आश्रम शाळा येथे बंधाऱ्याजवळ त्याचा मृयदेह आढळला. या घटनेची माहिती डहाणू तहसीलदारांना कळविण्यात आली असून महसूल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
 

Web Title: Sixteen-year-old tribal boy drowns in floodwaters in bordi