कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वसईतील शीख बांधवांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 20:00 IST2020-12-08T20:00:37+5:302020-12-08T20:00:47+5:30
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात वसईत संध्याकाळी शीख बंधू भगिनीची निदर्शने

कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वसईतील शीख बांधवांचा पाठिंबा
वसई - शेतकर्यांच्या आंदोलनाला वसईतील शीख भगिनी व बांधवांनी देखील पाठिंबा दिला आहे .मोदी सरकारने पारित केलेल्या अन्यायकारक कृषी विधेयकास विरोध करीत शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत वसईच्या अंबाडी रोडवरील गुरुद्वारा जवळ आज मंगळवारी संध्याकाळी जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.
केंद्र सरकारचा निषेध करत दुपारी 4 नंतर हे आंदोलन करण्यास सुरुवात झाली. यावेळी या गुरुद्वारा समोर 70 ते 80 शीख बंधू व भगिनी महिला यांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारचा निषेध केरीत घोषणाबाजी केली. अगदी जय जवान जय किसान आणि किसान एकता जिंदाबाद अशी जोरदार व उस्फुर्त निदर्शनं करत हा जुलमी कायदा रद्द करा आणि सामान्य शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी याप्रसंगी शीख समुदायांनी केली आहे.