शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या हप्त्यापासून घरकुल लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 05:56 IST

दारिद्रय रेषेखालील आदिवासी व इतर गोर-गरीबांना मंजूर केलेल्या २४२३ लाभार्थ्यांना घरकुल बांधणीचा दुसरा हप्ता गेले चार महिने मिळालेला नाही. त्याच्या अनुदानाचा पहिला हप्ता दिला.

शौकत शेख डहाणू : दारिद्रय रेषेखालील आदिवासी व इतर गोर-गरीबांना मंजूर केलेल्या २४२३ लाभार्थ्यांना घरकुल बांधणीचा दुसरा हप्ता गेले चार महिने मिळालेला नाही. त्याच्या अनुदानाचा पहिला हप्ता दिला. याला चार महिने उलटले तरी या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळालेला नसल्याने त्यांच्यात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत, बँक, तसेच पंचायत समिती कार्यालय येथे अनेकदा हेलपाटे मारूनही कुणीच दाद देत नाही.तालुक्यात शासनाने प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २४२३ घरकुले मंजूर केली. त्यासाठी प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार मंजूर होऊन सुरूवातीला बहुसंख्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीस हजार रूपये जमा केले. त्यानुसार घरकुलाच्या पायाभरणी होऊन ग्रामसेवकांमार्फत जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर फोटो अपलोड करण्यात आले.दरम्यान डहाणूतील एकूण २४२३ घरकुल लाभार्थ्यांपैकी सुमारे ६०० ते १००० घरकुल धारकांचे राष्टÑीयकृत बँकेत जनधन योजनेचे खाते आहे. या जनधन खात्याची क्षमता ३५ हजारांची असल्याने गोंधळ झाला आहे. बँक प्रशासन जनधन खात्यात एवढी मोठी रक्कम स्वीकारत नसल्याने दारीद्रय रेषेखालील कुटुंबांचे बँकेत हेलपाटे मारून हाल होत आहेत. त्यासाठी पालघर जिल्हा परिषदेने बँकेला पत्र देण्याची गरज आहे. परंतु चार महिने उलटूनही पंचायत समिती तसेच जिल्हा, परिषद ग्रामपंचायत प्रशासन कोणतीच उपाय योजना करीत नसल्याने डहाणूत प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अत्यंत बोजवारा उडाला आहे.उधारी फेडावी कशी? ही चिंता सतावते आहेअसंख्य लाभार्थ्यांनी व्याजाने तसेच उसनवारीने पैसे आणून घरकुल पूर्ण केले. परंतु चार महिने झाले तरी दुसरा हप्ता मिळत नसल्याने त्यांच्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे घरकुलाचा दुसरा हप्ता ६० हजाराचा येणार असल्याने त्यांनी पत्रे, विटा, सिमेंट तसेच इतर बांधकाम साहित्य उधारीने आणले होते. परंतु दुसरा हप्ता न मिळाल्याने त्यांचे पैशाविना हाल होत आहेत.