शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सफाळे - पारगाव रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:24 PM

आगरी समाज उन्नती मंडळाची मागणी; पावसाळ्यानंतर सुरू होणार काम

पारोळ : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोल नाका ते दारशेत गावाजवळून पारगाव, सफाळे भागात जाण्यासाठी महामार्गावरील सातिवली, दहिसरमार्गे फेरा मारावा लागतो. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरु झाल्या असून पावसाळ्यानंतर काम सुरु करण्यात येईल. हा रस्ता ३.७५ मीटर रुंदीचा असून एक पदरी असेल. यासाठी २.२५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा निघाली आहे.पारगाव पोलीस चौकीपर्यंतचा रस्ता झाला तर महामार्गावरून सफाळे, पालघरकडे जायचे जवळपास १५ कि.मी.चे अंतर वाचणार आहे. यामुळे साहजिकच वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. या रस्त्यादरम्यान असलेल्या दुर्गम आदिवासी भागातील गावे - पाडे वस्त्या इतर भागाशी पक्क्या रस्त्याने जोडली जाणार आहेत. या रस्त्याची मागणी १९७६ पासून होत होती. दारशेतच्या पुढे हा रस्ता कच्चा असून आजही हा प्रस्तावित रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेतच आहे.आगरी समाज उन्नती मंडळाने प्रथम १९७६ मध्ये खानिवडे येथील समाजाच्या अधिवेशनात खानिवडे, उंबरपाडा, दारशेत, सोनावे ते पारगाव अशा रस्त्याची मागणी केली होती. मात्र या रस्त्यासाठी मार्गामधील काही गावांनी विरोध केल्याने रस्ता रखडला. या रस्त्यासाठी १५ वर्षांपासून उन्नती मंडळ राजकीय नेते, संबंधित मंत्री, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या असून राज्य सरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नवे शासन स्थापन झाले आहे. आता हे नवे सरकार आमच्या मागणीचा विचार करेल, अशी आशा रहिवासी व्यक्त करत आहेत. आजही आमच्या गावात जाताना दर पावसाळ्यात तीन ते चार कि.मी. अंतर चिखलातून पार करावे लागत आहे. हा रस्ता झाला तर ही पायपीट संपून जाईल. त्यामुळे सरकारने हा रस्ता लवकर करावा, अशी विनंती येथील प्रवाशांनी केली आहे.हा रस्ता दारशेतच्या पुढून महामार्गकडे वनखात्याच्या जागेतून जात आहे. तिकडे वनखात्याने डांबरीकरण करण्यास मनाई केली आहे. याबाबतचे त्यांचे पत्र आम्हाला आले असून जोपर्यंत त्यांची ना हरकत मिळत नाही तोवर रस्त्याचे काम मार्गी लागू शकत नाही. मात्र सोनावे ते दारशेतपर्यंत रस्त्याचे काम होणार आहे.- महेंद्र किणी, उपअभियंता, बांधकाम विभाग, पालघर तालुकारस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, वनखात्याची काही अडचण निर्माण झाल्याने त्यांनी काम रोखले आहे. त्यांची मंजुरी मिळून लवकरच काम सुरु होईल असे समजले आहे.- नरसिंह पाटील, सचिव, आगरी समाज उन्नती मंडळ