शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

तलासरीत लाव्हारस उसळल्याची अफवा, तो व्हिडिओ बोगस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:36 PM

तलासरीत लाव्हारस उसळल्याचा व्हॉट्स अ‍ॅप मेसेज फिरू लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून भागात खळबळ माजली आहे

तलासरी  - तलासरीत लाव्हारस उसळल्याचा व्हॉट्स अ‍ॅप मेसेज फिरू लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून भागात खळबळ माजली आहे, परंतु अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगून अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन तलासरी तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी केले असून अशी अफवा पसरविणाऱ्याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.तलासरीच्या उधवा भागात खदाणीतून लाव्हारस बाहेर येत असल्याचा मेसेज व फोटो व्हॉटस अपवर फिरू लागल्याने भागात खळबळ उडाली, तलासरीच्या उधवा व करजगाव भागात प्रचंड खोल व मोठ्या खदानी असल्याने प्रथम लोकांना हे खरे वाटले. पण माहिती घेता असा कोणताही लाव्हारस बाहेर येत नसल्याचे समजले व ही अफवा असल्याचे समजल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.याबाबत उधवा गावचे सरपंच सुरेश शिंदा यांनी सांगितले की, परिसरात खदानीत असा काही प्रकार घडल्याचे दिसून आले नाही, ही अफवा आहे. तर करजगावाचे सरपंच लुईस काकड यांनीही असा प्रकार या भागात नसल्याचे सांगितले. तलासरीच्या उधवा व करजगाव भागात मोठ्या प्रमाणात खदानी आहेत. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट केले जातात याने जनता हैराण आहे. त्यातच खदानीत लाव्हारसच्या बातमीने त्यांच्यात घबराट पसरली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार