शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाला राेखण्यासाठी ‘नाकेबंदी’, रेल्वेस्थानक, नाक्यांवर पाेलीस, आराेग्य पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 01:57 IST

जिल्हा प्रशासनाच्या कडक उपाययाेजना : रेल्वेस्थानक, नाक्यांवर पाेलीस, आराेग्य पथके

हितेन नाईक/सुरेश काटेपालघर/तलासरी : जिल्ह्यात कोरोनाला प्रवेशबंदीसाठी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी कडक उपाययोजना आखल्या आहेत. महत्त्वपूर्ण चार रेल्वेस्थानके, चेकपोस्ट आणि आच्छाड तपासणीनाक्यावर आरोग्य आणि पोलीस विभागाची पथके तैनात केली आहेत. प्रवाशांची कडक तपासणी करून कुठलीही लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच पुढच्या प्रवासाचा मार्ग मोकळा केला जाणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना स्वखर्चाने नजीकच्या कोविड सेंटरमध्ये उपचार करून घ्यावे लागणार आहेत. सर्वत्र सकाळी ९ पासून तपासणी मोहीम सुरू झाल्याने वाहनांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनामार्फत नवीन कार्यप्रणाली जाहीर केल्याने पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद या राज्य महामार्गावरून दिल्ली, राजस्थान, गुजरात, सिल्वासा येथून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीसाठी तलासरी येथील आच्छाड तपासणीनाक्यावर आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची १२ पथके तैनात करण्यात आली आहेत. दुसरीकडे परराज्यांतून लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांतून येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणीसाठी डहाणू, बोईसर, पालघर आणि वसई या रेल्वेस्थानकांवर स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. जिल्ह्यात एक्स्प्रेस दाखल झाल्यानंतर प्रवाशांना आरटीपीसीआर अहवाल (कोविड-१९ चाचणीचा) हा ९६ तासांपूर्वी घेतलेला असावा, असे बंधनकारक केले आहे. ज्यांच्याकडे चाचणी अहवाल नसेल, त्यांची थर्मल गन आणि ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करताना कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची ॲण्टीजेन चाचणी केली जाणार आहे. ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तर पुढचा प्रवास करता येईल.

तीन नाेडल अधिकाऱ्यांची नियुक्तीजिल्ह्यात तीन नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. डहाणू तालुक्यासाठी सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पालघरसाठी उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर, तर वसईसाठी स्वप्नील तांगडे यांची नियुक्ती केलेली आहे. डहाणू स्थानकात लांब पल्ल्यांच्या सात एक्स्प्रेस ट्रेनना थांबा असून त्यातून उतरणाऱ्या प्रवाशांच्या तपासणी व इतर बाबींकडे लक्ष पुरवण्याची जबाबदारी डहाणू नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सोहम गुरव यांना तर, बोईसर स्थानकावर चार एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी पालघरचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, पालघर स्थानकावर दाेन एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्वाती देशपांडे आणि वसई येथे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार