शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रस्ते, रेल्वे अन् सागरात सुरक्षा कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:59 IST

पुलवामा दहशतवादी हल्यानंतर हायलर्ट जारी झाला असून रस्ते, रेल्वे आणि समुद्रीमार्गावर मोठ्या प्रमाणात सुरक्षात्मकदृष्टीने हालचालींना वेग आला आहे.

बोर्डी : पुलवामा दहशतवादी हल्यानंतर हायलर्ट जारी झाला असून रस्ते, रेल्वे आणि समुद्रीमार्गावर मोठ्या प्रमाणात सुरक्षात्मकदृष्टीने हालचालींना वेग आला आहे. समुद्रात तटरक्षक दलाने हावर्डक्राफ्टद्वारे तर रेल्वे सुरक्षा दलातर्फे उत्तर भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेसच्या बोगींची तपासणी केली जात आहे. सीमा भागातील रस्त्यांवरही पोलीस वाहनांची चौकशी करीत आहेत.मुंबई दहशतवादी हल्ल्यात कसाब आणि त्यांच्या साथीदारांनी अरबी समुद्रातून घुसखोरी करून गुजरात आणि पालघर जिल्ह्याच्या समुद्री मार्गाचा वापर केला होता. पाकिस्तान आणि गुजरातच्या समुद्र सीमेलगत हरामीनाला हा भाग घुसखोरीकरिता रेडअलर्ट समजला जातो. कच्छनंतर झाई बंदरापासून पालघर जिल्ह्याचा किनारा आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हायअलर्ट जारी केला असून त्या अनुषंगाने भारतीय तटरक्षक दलातर्फे सातत्याने समुद्रात हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याकरिता मुंबईहून हावर्डक्र ाफ्टला पाचारण केले आहे.या दलाच्या चिखले गावातील प्रकल्पालगतच्या रिठी किनाऱ्यावर ही क्र ाफ्ट आली आहे. त्यानंतर नेमाने पेट्रोलिंगचे काम केले जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेता कायमस्वरूपी ही अत्याधुनिक क्र ाफ्ट जिल्ह्यात असणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता डहाणू फोर्ट येथील खाडीत प्रस्तावित हावर्डक्र ाफ्ट पोर्ट लवकरच अस्तीत्वात आले पाहिजे. पश्चिम रेल्वेकडूनही उत्तर भारतातून येणाºया एक्स्प्रेस गाड्यांची डहाणू रोड रेल्वे स्थानकात आरपीएफ आणि जीआरपीएफकडून काटेकोर तपासणी केली जाते. त्यामध्ये पश्चिम एक्स्प्रेस व फिरोजपुर जनता या गाड्यांचा समावेश असून प्रत्येक बोगीत जाऊन प्रवाशांच्या सामान तपासले जाते. तर सीमा भागात गुजरात पोलिसांकडून कोस्टल मार्गावरील देहेरी चौकात वाहनांची तपासणी सुरू आहे. यावेळी मच्छीमार, रेल्वे प्रवासी सहकार्य करीत आहेत.>एनसीसी एनएसएसच्या छात्रांना संधी द्यावीमुंबई दहशतवादी हल्यानंतर किनाऱ्यांची सुरक्षा अभेद्य ठेवण्याकरिता सागरी पोलीस चौक्यांची उभारणी करण्यात आली. मात्र काही कालावधीनंतर त्याकडे दुर्लक्ष झाले असून आज कर्मचारी तैनात नाहीत. याकरिता गृह विभागाकडून मुबलक पोलीस कुमक दिली पाहिजे. शिवाय सागररक्षक आणि तत्सम दलाची उभारणी करताना स्थानिकांपैकी एनसीसी, एनएसएस, नेव्ही, स्कऊट व गाईड यांचा अभ्यासक्र म पूर्ण केलेल्यांचा समावेश होणे अधिक सोयीचे होईल.