शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरुन राडा, पश्चिम रेल्वेवर संतप्त प्रवाशांचा रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 1:14 PM

बोईसर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने दोन गटात जोरदार वाद झाला आहे.

पालघर - बोईसर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने दोन गटात जोरदार वाद झाला आहे. नेहमीच लोकलमध्ये बसण्यावरुन होणा-या वादाला वैतागलेल्या काही संतप्त प्रवाशांनी रेल रोको करत आपला राग व्यक्त केला. यामुळे एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेवरील गाड्या आणि लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आणि पश्चिम रेल्वेच्या हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. 

सोमवारी (29 जानेवारी) सकाळी बोईसर स्थानकात हा प्रकार घडला. प्रवासी लोकलमध्ये शिरल्यानंतर पासधारक आणि अन्य प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. एक पुरुष आणि महिला प्रवाशात बसण्याच्या जागेवरून  शाब्दिक चकमक उडाली. काही वेळानं अन्य प्रवासीही या भांडणात सहभागी झाले. हे प्रकरण एवढं वाढलं की हाणामारी सुरू झाली.  यानंतर काही संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत वांद्रे-भुज पॅसेंजर ट्रेन रोखून धरली व घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे बोईसर रेल्वे स्थानकात काही काळ तणावाचे वातावरण होते. 

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वांद्रे-भुज एक्स्प्रेस पुढील मार्गाकडे रवाना होऊ शकली. मात्र, प्रवाशांच्या रेलरोकोमुळे पश्चिम रेल्वेवरील एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल तासभर रखडली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस प्रवाशांना तासभर नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, भांडण करणाऱ्या एक पुरुष आणि एका महिला प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वे