शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

रायगडचा मयूर घरत ठरला ‘धर्मवीर श्री २०२०’ चा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 12:26 AM

रायगड जिल्ह्याचा मयूर घरत या वर्षीचा ‘धर्मवीर श्री २०२०’ ठरला असून वाड्यातील पी.जे. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत हा किताब पटकावला.

वाडा : रायगड जिल्ह्याचा मयूर घरत या वर्षीचा ‘धर्मवीर श्री २०२०’ ठरला असून वाड्यातील पी.जे. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत हा किताब पटकावला. तर ‘वाडा श्री’ म्हणून वाड्यातील पप्पू नांगरे याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

शिवसेना अंगीकृत चर्मोद्योग कामगार सेना आणि भारतीय माथाडी आणि जनरल कामगार सेना, पालघर डिस्ट्रिक्ट/वेस्टर्न ठाणे बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन, संत रोहिदास शैक्षणिक, सामाजिक क्रीडा संस्था, आणि टायगर ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने ह्यधर्मवीर श्री २०२० शरीरसौष्ठव’ स्पर्धेचे आयोजन बुधवारी येथील पी. जे. हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील साधारण ८० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. तरुणांना आरोग्याचे महत्त्व समजावे, त्यांच्यात व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने १३ वर्षांपासून आम्ही या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करीत असून दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया चर्मोद्योग कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि स्पर्धेचे आयोजक भरत गायकवाड यांनी दिली.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी टायगर ग्रूपचे मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे, उपतालुका प्रमुख तुषार यादव, शहर प्रमुख नरेश चौधरी, नगराध्यक्षा गीतांजली कोळेकर, महिला आघाडीच्या विक्रमगड विधानसभा संघटक मनाली फोडसे, युवासेनेचे सचिन पाटील आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र