शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा, पालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण 0.01 टक्के! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 9:06 AM

राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरणाला परवानगी मिळाली होती. एकीकडे लसींचा साठा अपुरा आणि लसीकरणासाठी होणारी ज्येष्ठांसह तरुणांची गर्दी चिंतेचा विषय ठरत होती.

जगदीश भोवड/हितेन नाईक - पालघर : लसीकरणासाठी एकीकडे ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा दिसत असताना, १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाही लसीकरणासाठी परवानगी मिळाल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होताना दिसत होती. ही केंद्रेच कोरोनाची ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती व्यक्त होत होती. अखेर सरकारने आता ज्येष्ठ आणि दिव्यांगांना ‘लसदिलासा’ दिला आहे. यामुळे यापुढे तरी ज्येष्ठ नागरिकांना रांगा लावाव्या लागणार नाहीत, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण फक्त ०.०१ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरणाला परवानगी मिळाली होती. एकीकडे लसींचा साठा अपुरा आणि लसीकरणासाठी होणारी ज्येष्ठांसह तरुणांची गर्दी चिंतेचा विषय ठरत होती. लसींचा साठा शिल्लक नसल्याने जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचीही वेळ प्रशासनावर आली होती. यामुळे खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रे बंदच ठेवली गेली होती. दुसरीकडे वसई-विरारसह अनेक शहरी भागांतील नागरिकांना पालघरच्या ग्रामीण भागांतील लसीकरण केंद्रांवरचा स्लॉट मिळताना दिसत होता. मात्र त्यामुळे त्या त्या लसीकरण केंद्रांवर संघर्ष होतानाही दिसत होते. दरम्यान, सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता ज्येष्ठांचे लसीकरण आधी होणार असून, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्पपालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प असून, आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार ०.०१ टक्के डोस वाया गेले आहेत. आरोग्य खात्याने योग्य नियोजन करून डोस दिल्यामुळेच जिल्ह्यात डोस जास्त वाया गेले नाहीत, ही समाधानाची बाब आहे.

सकाळी सातपासूनच रांगा- पालघर जिल्ह्याच्या एकूण आठ तालुक्यांतील शहरी, ग्रामीण तसेच डोंगराळ भागांतील नागरिकांमध्ये लसीकरणासाठी सुरुवातीला फारसा उत्साह दिसून येत नव्हता. - मात्र कोरोनाची दुसरी लाट अनेकांना बाधित करीत असल्याचे आणि त्यात अनेक कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांमध्ये भीती पसरली. - यानंतर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होऊ लागली. यामुळे सकाळी सहा-सात वाजल्यापासूनच लोक रांगा लावत असल्याचे दिसून येऊ लागले.

जिल्ह्यात आजवर झालेले लसीकरण    ३,१२,२७०१८ ते ४४ साठी किती?    १५,३३३४५ पेक्षा जास्त वयोगटासाठी किती?    १८४६७९

काही पहिल्या तर काही दुसऱ्या डोससाठी रांगेत१ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणास परवानगी मिळाल्यानंतर तर लसीकरण केंद्रांवर मोठी रांग लागताना दिसून येऊ लागली. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठी गर्दी उसळत असे. यामध्ये १८ ते ४४ वर्षांदरम्यानचे लोक पहिल्या डोससाठी, तर ४५ वर्षांवरील लोक दुसऱ्या डोससाठी रांगेत असलेले पाहायला मिळाले. तर अनेकवेळा लसींचा साठा संपल्याने लोकांना निराश होऊन परतावे लागत असल्याचेही दिसून आले.

जिल्ह्यात लसी वाया जाण्याचे प्रमाण ०.०१ टक्के इतके अत्यल्प आहे. नियोजनात्मक लसीकरण मोहीम अवलंब केला जात असताना, १० लाभार्थी आल्याशिवाय लस वायल उघडली जात नाही. परिणामी लस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.- डॉ. मिलिंद चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., पालघर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजन