शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वसईमध्ये घडू शकते पुणे; मालाडसारखी घटना, भीतीच्या छायेखाली शिवापाड्यातील नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:59 PM

मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या शिवापाडा परिसरातील चाळीच्या बाजूलाच असलेल्या अनधिकृत इंडस्ट्रीज कंपनीच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेली भिंत चाळीवर पडण्याची भीती नागरिकांना सतावते आहे.

नालासोपारा : मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या शिवापाडा परिसरातील चाळीच्या बाजूलाच असलेल्या अनधिकृत इंडस्ट्रीज कंपनीच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेली भिंत चाळीवर पडण्याची भीती नागरिकांना सतावते आहे. ही भिंत यापूर्वी चाळीवर पडल्याची घटना घडलेली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपर्यंत अनेक तक्रारी झाल्या आहेत. पण तहसीलदारांनी १५ जुलै रोजी या भिंतीवर नाममात्र कारवाई केली होती. पण ती भिंत पुन्हा बांधण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विशेष म्हणजे वसई पूर्वेकडील वालीव परिसरात शेकडो सरकारी जमिनीवर अतिक्र मण करून मोठमोठ्या इंडस्ट्रीज कंपन्या दिमाखात उभ्या आहेत. महसूल अधिकारी या कंपनीवर कारवाई करण्यासाठी चालढकल करत असून महानगरपालिका कारवाई करणार असे सांगत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, वसई फाटा येथे शिवापाडा गाव असून शेकडो गरीब परिवार चाळीमध्ये राहतात. या गावाच्या आजूबाजूची काही जमीन सरकारी आहे. या सरकारी जमिनीवर अनधिकृत पद्धतीने मोठ्या इंडस्ट्रीज उभ्या आहेत. या कंपनीच्या संरक्षक भिंती गावातील घरांच्या बाजूनेच बनविण्यात आल्या आहेत. काही भिंती तर झुकलेल्या आहेत.मंडळ आणि तलाठ्याने सर्व्हे केला; पण कारवाई नाही : सेठीया इंडस्ट्रीजचे अनिधकृत गाळे बांधले असून त्याचा पंचनामा करत तहसीलदारांना पेल्हार तलाठीने १६ जून २०१९ ला अहवाल पाठवला आहे तर मांडवी येथील मंडळ अधिकारी यांनी सदर जमिनीवरील बांधकामाबाबत कुठल्याही शासकीय प्रकारची परवानगी नसल्याने कारवाई करावी असा अहवाल तहसीलदारांना ६ जुलै २०१९ ला पाठवला आहे. तसेच ही वन खात्याकडील जमीन अल्प भूधारक व भूमिहीन आदिवासी लोकांना वाटण्यासाठी महसूल खात्याच्या ताब्यात दिली होती. मात्र, त्यांच्या दुर्लक्षामुळे येथे अनेक इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी तहसीलदारांना अहवाल पाठवल्यावर दीड महिना उलटूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.अनिधकृत बांधकामावर कारवाई करण्याची जवाबदारी महानगरपालिकेची आहे. पण जमिनीबाबत नेमकी काय स्थिती आहे, याबाबत तहसीलदारांशी बोलतो.- डॉ.कैलास शिंदे, जिल्हाधिकारीही जमीन नवीन शर्तीची असून याची भिंत एकदा पाडली आहे. परत भिंत बांधली असल्यास त्याची माहिती घेतो. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालावर लवकर कारवाई करण्यात येईल.- किरण सुरवसे, तहसीलदार, वसईया कंपनीला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. सदर जमिनीचा आणि कंपनीचा पंचनामा केला असून कारवाईसाठी अहवाल पाठवला आहे. - सुशांत ठाकरे, मंडळ अधिकारी, मांडवी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार