नायजेरीयन युवकांच्या पार्टीवर पोलिसांची धाड

By Admin | Updated: October 6, 2015 00:07 IST2015-10-06T00:07:15+5:302015-10-06T00:07:15+5:30

विरार पश्चिमेस राजोडी-कळंब समुद्रकिनारी एका रिसॉर्ट्समध्ये सुमारे १०० नायजेरीयन तरुणांनी पार्टीचे आयोजन केले होते. याचा सुगावा ग्रामस्थांना लागला असता

Police outpost on Nigerian youth party | नायजेरीयन युवकांच्या पार्टीवर पोलिसांची धाड

नायजेरीयन युवकांच्या पार्टीवर पोलिसांची धाड

वसई : विरार पश्चिमेस राजोडी-कळंब समुद्रकिनारी एका रिसॉर्ट्समध्ये सुमारे १०० नायजेरीयन तरुणांनी पार्टीचे आयोजन केले होते. याचा सुगावा ग्रामस्थांना लागला असता त्यांनी त्वरित पोलिसांना त्याची माहिती दिली. अर्नाळा सागरी पोलिसांनी त्या रिसॉर्ट्सवर धाड टाकून या सर्वांना ताब्यात घेतले. याप्रकरणी या रिसॉर्ट्सचा मालक, मॅनेजर व कर्मचारी अशा तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कळंब-राजोडी येथील ओअ‍ॅसिस रिसॉर्ट्समध्ये १०० हून अधिक नायजेरीयन युवक जमा झाले होते. तेथे दारूची पार्टी सुरू असल्याची खबर लागताच स्थानिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन या सर्वांना ताब्यात घेतले. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
(प्रतिनिधी)

Web Title: Police outpost on Nigerian youth party