Police convict Patil for killing Bhekar | भेकर मृत्यूप्रकरणी पोलीस पाटलावर गुन्हा
भेकर मृत्यूप्रकरणी पोलीस पाटलावर गुन्हा

विक्रमगड : डोल्हारी बु. पाटीलपाडा येथील पोलीस पाटील सुरेश बारकू उमतोल यांच्याकडे जंगलातील भेकर पकडून बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळताच विक्र मगड वन विभागाने त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा हे भेकर खांबाला दोरीने बांधलेले आढळले. या भेकराला नीट उभेही राहता येत नव्हते. वन विभागाने हे भेकर ताब्यात घेऊन ते विक्र मगड वनक्षेत्रपालांच्या कार्यालयात आणून त्याच्यावर पशूवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार केला. मात्र या भेकराचा मृत्यू झाला.

या भेकराला काठीने बेदम मारहाण केलेली असावी, असा संशय पशू वैद्यकीय डॉक्टरांनी तपासणीअंती व्यक्त केला. विक्रमगड वनविभागाने डोल्हारी बु. पाटीलपाडा येथील पोलीस पाटील सुरेश बारकू उमतोल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यासंदर्भात विक्रमगड वन विभागाचे वनक्षेत्रपाल एन.बी.शिंदे अधिक चौकशी करीत आहेत.

सदर प्रकरणाची माहिती आम्हाला मिळताच आम्ही आमच्या पथकासहित सदर ठिकाणी पोहचलो. त्यावेळेस सदर भेकर हे जखमी अवस्थेत होते. आम्ही तत्काळ त्याच्यावर उपचार केले, परंतु ते मृत झाले. या प्रकरणात आम्ही संशयित म्हणून एकास अटक केले असून अधिक चौकशी करीत आहोत.
-एन.बी.शिंदे,
वनक्षेत्रपाल, विक्र मगड

Web Title: Police convict Patil for killing Bhekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.