शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमध्ये खड्डेच खड्डे; दुरुस्तीचा खर्च वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:45 IST

नागरिकांचे होताहेत हाल

विरार : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वसई-विरारमधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले दिसत आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणेसुद्धा मुश्कील होत असून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या अगोदर रस्ते दुरुस्तीचे काम सुरू होणे गरजेचे असतानाही पालिकेने अजूनही या कामाचा शुभारंभ केला नसल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.

वसई-विरार महापालिकेने पावसाळा सुरू झाला तरी खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केलेले नाही. पालिकेने मागील दोन वर्षांपासून रस्ते दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपये खर्च केला असूनही शहरातील रस्त्यांची चाळण होत आहे.सध्या कोरोना काळ सुरू असल्याने रेल्वे सुविधा  बंद आहेत. यामुळे रस्ते वाहतूक वाढली आहे. पण खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेची विकासकामे थांबवली आहेत. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. मागील आठवडाभराच्या संततधार पावसाने शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे तयार झाले आहेत.

काही ठिकाणचे डांबर वाहून गेले आहे, तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक निखळले आहेत. त्याचबरोबर अपघातांची भीती निर्माण झाली आहे. तर खड्ड्यांमुळे वाहनांचे सुद्धा नुकसान होत आहे. खड्डे भरणीची कामे झाली नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे.पालिकेने खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. कोरोना महामारीमुळे या कामाला थोडा उशीर झाला आहे. पण लवकरच शहरातील रस्ते दुरुस्त केले जातील.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता,

वसई-विरार महापालिका

महानगरपालिका रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत आहे. काही ठिकाणी खड्डे भरण्यासाठी केवळ खडी भरली जाते. पण पावसाच्या पाण्याने खडी वाहून जाऊन रस्त्यावर इतरत्र पसरते. यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत.- प्रफुल्ल जाधव, रहिवासी, मनवेलपाडा, विरार

टॅग्स :Vasai Virarवसई विरार