शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कामांच्या नावावर पालघर नगरपरिषदेत लूट?

By admin | Updated: January 8, 2016 01:54 IST

नगरपरिषदेमार्फत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात असून या कामावर अवास्तव खर्च दाखवून नगरपरिषदेच्या म्हणजेच जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे.

पालघर : नगरपरिषदेमार्फत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात असून या कामावर अवास्तव खर्च दाखवून नगरपरिषदेच्या म्हणजेच जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसएनडीटी कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर पाईप टाकण्याच्या कामासाठी दाखविलेल्या ४९ हजार १०८ रू. चा खर्च याचे प्रतिनिधीक उदाहरण म्हणून दाखविता येईल. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.एसएनडीटी महाविद्यालयाच्या राखीव भूखंडाच्या प्रवेशद्वारासमोर गटार असल्याने तेथे सिमेंट पाईप लाईन टाकणे जरुरीचे होते. या भूखंडाचा वापर अलिकडे प्रशिक्षणार्थी पोलीसांच्या सरावासाठीही केला जात असल्याने हे काम गरजेचे होते. त्यानुसार ३ आॅगस्ट २०१५ च्या आदेशाने या गटारीत ९०० मि. मि. व्यासाचे व २.५ मीटर लांबीचे सिमेंट पाईप टाकण्यात आले होते. या दोन पाईप साठी ७ हजार ७३५ इतका खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र या कामी सोलींग तसेच १.२.४ तसेच १. १ १/२ (दिड). ३ या प्रमाणात वापरण्यात आलेले काँक्रीट मिक्सर यासाठी दाखविलेला खर्च प्रत्यक्षातील कामापेक्षा खुपच अधिक आहे. या कामात पाईप टाकण्यापूर्वी सुमारे पाव (१/४) ट्रक मोठी खडी वापरल्याचे दाखविण्यात आले असून त्यासाठी २ हजार ५५९ रू. इतका खर्च दाखविला आहे व त्यानंतर त्यावर सिमेंट पाईप टाकून त्यावर १. १ १/२ (दिड). ३ या प्रमाणात ४.७० घनमिटर काँक्रीट मिक्सर (म्हणजेच सुमारे पाऊण ट्रक खडी व रेती तसेच ३० हुन अधिक पोती, सिमेंटच्या वापर करून) टाकल्याचे व त्यासाठी २९ हजार ९५८ रू. इतका खर्च झाल्याचे दाखविले आहे व त्यानुसार या कामापोटी निधी इंटरप्रायजेसच्या ठेकेदाराला ४९ हजार १०८ इतकी रक्कम ही अदा करण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष पाहिल्यास झालेला खर्च व काम यात मोठा फरक दिसून येत आहे. छायाचित्रातील सिमेंट पाईपवर टाकलेले सिमेंट मिक्स्चर (ज्यासाठी २९ हजार ९५८ रू. चा खर्च झालेला आहे.) हे याचे ठसठसीत उदाहरण म्हणून दाखविला येईल. जिल्हाधिकारी कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कामाची पाहणी करून चौकशी करावी व कारवाई करावी अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. अर्थात हे एक छोटेसे प्रतिनिधीक उदाहरण असून पालघर शहरामध्ये विकासकामाच्या नावाखाली २५ ते ३० कोटी रू. ची कामे कमी अधिक प्रमाणात अशाच स्वरूपाची असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)