Palghar MP Rajendra Gavit has been booked for molestation at Mira Bhayander police station | शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्याविरुद्ध मीरा-भाईंदर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल 

शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्याविरुद्ध मीरा-भाईंदर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल 

वसई- पालघर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर मीरा भाईंदर -वसई विरार  पोलीस आयुक्तांलय हद्दीतील नयानगर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खास राजेंद्र गावित यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे सर्व मला आताच समजलं असून हे एक षड्यंत्र असल्याचे खास गावित यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं.

दरम्यान याबाबत अधिक बोलताना खास. राजेंद्र गावित यांनी सांगितले की, मध्यतरी माझ्या गॅस एजन्सी मध्ये दोन ते तीन जणांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा गॅसचा काळा बाजार केला होता त्यात अलीकडच्या काळात रंगेहाथ गॅस सिलेंडर चा ट्रक पकडून माझ्या कार्यालयतील कर्मचारी यात सहभागी होते असे ही सिद्ध झाले होते,त्यात ही आरोप करणारी महिला ही होती परंतु गुन्हा दाखल झाल्यावर अन्य दोघेही अटकेत गेले मात्र महिलेने अटकपूर्व जामीन घेतल्याने तीला अटक झाली नाही आणि अखेर अशा प्रकारे मला यात हेतुपुरस्सर गोवणंच्या प्रयत्न करून माझ्याविरुद्ध खोटा विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

एकूणच सदर महिलेने अशी काही तक्रार केली आहे याची संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गानी मला रीतसर काहीही माहिती वजा नोटीस दिली नाही आणि अचानकपणे हा गुन्हा दाखल होतो हे सर्व संशयास्पद व राजकीय असूये ने झाले असून याबाबत दोषींवर मानहानी चा गुन्हा व संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे ही खास गावित यांनी लोकमत ला सांगितले.

अर्थातच अचानकपणे खास राजेंद्र गावित यांच्यवर असा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.मागील काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक  यांच्यावर ईडीने कारवाई केली होती आणि आता लक्ष पालघरचे खासदार म्हणून या घडामोडी बाबतीत मात्र संशय बळावतो आहे.

Web Title: Palghar MP Rajendra Gavit has been booked for molestation at Mira Bhayander police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.